शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नेमका कोणाचा? शिंदे गटाकडून इतर पर्यायांचीही चाचपणी

मुंबई तक

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीवरुर शिवसेनेतील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आमने-सामने आला आहे. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात जाण्याची शक्यता आहे. अशातच शिंदे गटने इतर मैदानांच्या पर्यायांची चाचपणी सुरु केली असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाकडून बीकेसीतील एमएमआरडीएम मैदान, सोमय्या मैदान आणि मेस्को मैदानाची चाचपणी सुरु केली आहे, अशी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीवरुर शिवसेनेतील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आमने-सामने आला आहे. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात जाण्याची शक्यता आहे. अशातच शिंदे गटने इतर मैदानांच्या पर्यायांची चाचपणी सुरु केली असल्याची माहिती मिळत आहे.

शिंदे गटाकडून बीकेसीतील एमएमआरडीएम मैदान, सोमय्या मैदान आणि मेस्को मैदानाची चाचपणी सुरु केली आहे, अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. मात्र अद्यापही शिंदे गटाकडून शिवाजी पार्क मैदानासाठी करण्यात आलेला अर्ज माघारी घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवाजी पार्कसाठी आता नेमकी कोणाला परवानगी मिळणार याची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.

शिंदे गट म्हणू नका शिवसेना एकनाथ शिंदेंचीच- तानाजी सावंत

शिंदे गटाच्या भूमिकेकडे लक्ष

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कवर होत असतो. मात्र कोरोना काळात तो होऊ शकला नव्हता. दरम्यान, शिवसेनेत फूट पडून शिंदे गट निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा पुढे नेत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे दसऱ्या मेळाव्यासाठीही शिंदे गटाकडून अर्ज करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp