पांडुरंगाची काय लीला आहे की, देवेंद्रजी दोन नंबरला अन्…; एकनाथ खडसेंचं फडणवीसांच्या वर्मावर बोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नितीन शिंदे, पंढरपूर

ADVERTISEMENT

माजी मंत्री आणि नवनिर्वाचित आमदार एकनाथ खडसे यांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला जाऊन विठ्ठल-रुखमाईचं दर्शन घेतलं. वारीनिमित्त पंढरपुरला आलेल्या एकनाथ खडसेंसोबत ‘मुंबई Tak’ने संवाद साधला. यावेळी त्यांनी पंढरपूर वारीबद्दलच्या आठवणी सांगतानाच सद्याच्या राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांनाही चिमटा काढला.

वारीबद्दलच्या आठवणी सांगताना एकनाथ खडसे म्हणाले, “बालवयापासून मी माझ्या आईवडिलांसोबत वारीला येतो. फार कमी वेळा असं झालं की, मी आषाढीच्या वारीला आलो नाही. सातत्याने वारीला येण्याचा प्रयत्न मी केला. पूर्वी बसेस खूप कमी होत्या. जळगाववरून बसेस सुटायच्या. त्यामुळे भुसावळपासून कुर्डूवाडीपर्यंत रेल्वेनं यायचो आणि नंतर छोट्या रेल्वे गाडीने पंढरपूरला यायचो. एकदा पायी वारी करण्याचा प्रयत्न केला, पण येताना पायी आलो आणि जाताना गाडीने गेलो होतो,” असं एकनाथ खडसे म्हणाले.

हे वाचलं का?

“पंढरपूर वारीच्या बऱ्याच आठवणी आहेत. मी १२-१३ वर्षाच्या असताना यात्रेत हरवलो होतो. आई-वडील शोधत होते. मठ शोधत फिरत होतो, त्यावेळी गावकडच्या एका वारकऱ्यांने मला ओळखलं आणि तिथे घेऊन गेला,” अशी आठवण एकनाथ खडसे यांनी सांगितली.

राज्यात झालेल्या सत्तांतराबद्दलही एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं. “काही गोष्टी अनपेक्षितपणे घडतात. कधी असं वाटलं नव्हतं की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अन् देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील. देवेंद्र फडणवीसच आषाढी वारीला येतील अशा स्वरुपाचे पोस्टर्स होते. सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस पांडुरंगाची पूजा करताहेत अशा पोस्ट होत्या. पण पांडुरंगाची काय लिला आहे की देवेंद्र फडणवीस दोन नंबरला आणि एकनाथ शिंदे एक नंबरला,” असं म्हणत एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांच्या वर्मावर बोट ठेवलं.

ADVERTISEMENT

नागपूर, ठाण्याचे हरुन-अल-रशीद; संजय राऊतांची फडणवीस-शिंदेंवर टीका, अमृता फडणवीसांचे मानले आभार

ADVERTISEMENT

“पूर्वी नाथाभाऊ दोन नंबरला होते. देवेंद्र फडणवीस एक नंबरला होते. आता नाथाभाऊंच्या ठिकाणी देवेंद्रजी आले आहेत. त्यामुळे दोन नंबरचं दुःख काय असतं, हे त्यांच्या लक्षात येत असेल.”

या सरकारमध्ये एकनाथ हेच एक नंबरला आहे, असा प्रश्न खडसे यांना विचारण्यात आला. त्यावर खडसे म्हणाले, “मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना एकनाथ हे नाव अधिक जवळच आहे. कारण मी त्यांच्याबरोबर काम केलंय. त्यामुळे एकनाथ या नात्याने त्यांचं माझं नातं होतं. आताही एकनाथ त्यांना एकनाथ… एकनाथ हे करावंच लागतं. देवेंद्रजींच्या मुखी एकनाथ हे नाव २४ तास असणार याचं मला समाधान आहे,” असं एकनाथ खडसे म्हणाले.

नव्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांबद्दल बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “मला या सरकारकडून अपेक्षा आहेत. देवेंद्रजींनी गेल्या दोन अडीच वर्षात मोठ्या पद्धतीने ओबीसींबद्दल आवाज उठवला. ओबीसी आरक्षण, इम्पिरिकल डेटावरून. मी ओबीसी नेता आहे. त्यामुळे सरकारने आधी ओबीसींना न्याय द्यावा असं मला वाटतं,” असं एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.

आषाढी वारी २०२२ : मुख्यमंत्री शिंदेंनी केली विठ्ठलाची महापूजा, वारकरी नवले दाम्पत्याला मिळाला मान

शिवसेनेतून फुटलेल्या आमदारांबद्दल एकनाथ खडसे म्हणाले, “आता हे सगळे भाजप समर्थक झाले आहेत. काही दिवसांनी हे कदाचित भाजपत जातील. अनेकांच्या मागे ईडी लागलेली आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आपला तो बाळ्या, दुसऱ्याचं ते कार्ट अशा पद्धतीने बाळ्याला संरक्षण देतील, असं मला वाटतं.”

“ईडीमधील लोकांची सुटका होईल, असं मी म्हणत नाहीये, तर हर्षवर्धन पाटील म्हणतात. सांगलीचे खासदार म्हणतात की, आपल्याला ईडीचा धाक नाहीये. त्यामुळे ईडीच्या जाचातुन सुटका होईल असं त्यांना वाटत असावं, त्यामुळे पुढचा काळ बघुयात की किती लोकांना बोलावतात. ईडी मागे लागलेले पवित्र झालेत का हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे,” असं सांगत एकनाथ खडसे यांनी ईडीवरून भाजपवर निशाणा साधला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT