Eknath Shinde: ”राज्यपालांचे विधान वैयक्तिक, त्यांच्याशी आम्ही सहमत नाही”
नाशिक: राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari) मुंबईबद्दल केलेल्या विधाननंतर राज्यातील वातावरण तापले आहे. त्यानंतर थेट राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर स्वत: राज्यपाल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपले मत मांडले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज नाशिक […]
ADVERTISEMENT
नाशिक: राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari) मुंबईबद्दल केलेल्या विधाननंतर राज्यातील वातावरण तापले आहे. त्यानंतर थेट राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर स्वत: राज्यपाल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आपले मत मांडले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज नाशिक दौऱ्यावर आहेत, तिथे माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
”राज्यपालांचे विधान हे वैयक्तीक आहे, त्यांच्याशी आम्ही सहमत नाही. मुंबईच्या विकासामध्ये मराठी माणसाचं योगदान कोणी नाकारु शकत नाही. मराठी माणसाचं काम कोणालाही नाकारता येणार नाही. १०५ हुताम्यांचं हुताम्य कोणालाही नाकारता येणार नाही. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे मुंबईसाठी योगदान सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मराठी माणसांमुळे मुंबईला वैभव, नावलौकीक प्रात्प झालेला आहे” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
”उपमुख्यमंत्री महोदयांवी देखील याबाबत खुलासा केलेला आहे, त्याचबरोबर राज्यपालांनी देखील खुलासा केलेला आहे. राज्यापाल मोठं पद आहे, कोणाचा अवमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मराठी माणसाच्या त्यागाची अवहेलना करता येणार नाही. आमची स्पष्ट भूमिका आहे की मराठी माणसाचे योगदान नाकारता येणार नाही.” मुंबईने अनेक संकटं पाहिलं आहेत, परंतु शिवसेना प्रमुख पाठिशी उभे राहिले आहेत. शिवसेना म्हणून आम्ही त्यांच्या विधानाशी सहमच नाही असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
Uddhav Thackray: “महाराष्ट्राशी नमकहरामी करणाऱ्या कोश्यारींनी राज्यपाल पदाची शान घालवली”
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
”राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये आणि वाटचालीमध्ये मराठी माणसाचं जे कार्य, श्रेय आहे ते सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रातही मराठी माणसाने जी प्रगती केली आहे त्याने जगभरामध्ये मराठी माणसाचं नाव झालं आहे. वेगवेगळ्या समाजाचं योगदान आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मराठी उद्योजक, मराठी साहित्यिक यांचे योगदान सर्वात जास्त आहे. देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग मोठा आहे.” असे वक्तक्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT