एकनाथ शिंदेंच्या नाटकाने राणे, भुजबळांच्या नाटकावर पडदा पडला; सामनातून मुख्यमंत्र्यांवर टिका

मुंबई तक

मुंबई: सामनातून आज पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवरती टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सामनातून निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा ‘ नाईट किंग’ म्हणून उल्लेख यामध्ये केला आहे. कारण मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत आपण देवेंद्र फडणवीसांना कसे भेटत होतो याचा किस्सा शिंदेंनी भर सभागृहात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: सामनातून आज पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवरती टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सामनातून निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा ‘ नाईट किंग’ म्हणून उल्लेख यामध्ये केला आहे. कारण मुख्यमंत्री शिंदेंनी विधानसभेत आपण देवेंद्र फडणवीसांना कसे भेटत होतो याचा किस्सा शिंदेंनी भर सभागृहात सांगितला होता. आगामी निवडणुकीत दोनशे जागा निवडून आणण्याचा दावा शिंदेंनी केला आहे. याच सर्व अनुषंगाने सामनातून टिका करण्यात आली आहे.

काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात?

मतदारांनाही विकत घेऊ याबाबतचा आत्मविश्वास?

महाराष्ट्रात शिंद्यांचे सरकार आले आणि पंतप्रधान मोदी यांनी वचन दिले की, ‘महाराष्ट्राला काहीच कमी पडू दिले जाणार नाही.’ दिल्लीचे सरकार राज्यातून शिवसेनेचा मुख्यमंत्री जाण्यासाठी पाण्यात देव घालून बसले होते. राज्य गेल्याशिवाय महाराष्ट्राला त्याचे हक्क द्यायचे नाहीत असे जणू त्यांनी ठरवूनच टाकले होते. शिंदे व फडणवीस यांच्या सरकारला हवे ते देऊ. त्या बदल्यात ही जोडगोळी भाजपला पुढच्या विधानसभेत दोनशे जागा मिळवून देणार आहे. नशीब विरोधकांचे की, त्यांनी 288 जागांचा वायदा केला नाही. फुटीर गटाचे नेते आणि मुख्यमंत्री श्री. शिंदे सांगतात, ‘‘त्यांच्याबरोबर गेलेल्या पन्नासेक आमदारांपैकी एकाचाही पराभव होणार नाही.’’ हा महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेवर दाखविलेला अविश्वास म्हणावा की, जसे आमदार विकत घेता येतात तसे मतदारांनाही विकत घेऊ याबाबतचा आत्मविश्वास? असा सवाल सामनातून विचारला आहे.

शिंदे-फडणवीसांची वक्तव्ये म्हणजे बाजारातील ‘उधारीचा माल’

हे वाचलं का?

    follow whatsapp