BJPच्या रडारवर आलेल्या इक्बालसिंग चहल यांचं शिंदेंकडून तोंड भरून कौतुक
मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंग चहल यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले. ते ठाकरेंचे खास अधिकारी असल्याचाही आरोप भाजपकडून केला जात असताना शिंदेंनी चहल यांचं कौतुक केलं. त्यामुळे आता भाजपची भूमिका काय असणार हे पाहावं लागेल? मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले, “मी मोदींचा आभारी आहे की, महाराष्ट्रातील चार शहरात जी20 समीट […]
ADVERTISEMENT

मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंग चहल यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले. ते ठाकरेंचे खास अधिकारी असल्याचाही आरोप भाजपकडून केला जात असताना शिंदेंनी चहल यांचं कौतुक केलं. त्यामुळे आता भाजपची भूमिका काय असणार हे पाहावं लागेल?
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले, “मी मोदींचा आभारी आहे की, महाराष्ट्रातील चार शहरात जी20 समीट होत आहे. मुंबईत झाली. पुणे, नागपूर आणि औरंगाबादमध्ये होईल. जगभरातील लोक मुंबईत आले होते. ते इतके खूश झाले.”
“मी बीएमसी आयुक्त इक्बालसिंग चहल यांचे आभार मानतो. त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्यांनी मुंबईला चमकावून टाकलं. मग लोकांच्या पोटात त्रास सुरू झाला. 15-20 वर्ष तुम्हाला संधी होती. तुम्ही केलं नाही, आम्ही सहा महिन्यात केलं. आता चांगलं तरी म्हणा”, असं शिंदे म्हणाले.
“मुंबईत जे 20-25 वर्षात झालं नाही, ते आता होतंय. लोकांना बदल दिसतोय. आम्ही विकासाबरोबर पुनर्विकासाचे प्रकल्प पुढे नेतोय. मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असंही शिंदे म्हणाले.