एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांचे मोबाईल टॅप केले जायचे?; मुख्यमंत्र्यांचा नवा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. भाजपसोबत सरकारही स्थापन केलंय. या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष समोर आला. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका करताना आणि आव्हान देताना दिसाहेत, पण आता शिंदेंनी नवा गौप्यस्फोट केलाय. आपले महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमचे फोन टॅप केले जात […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. भाजपसोबत सरकारही स्थापन केलंय. या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष समोर आला. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका करताना आणि आव्हान देताना दिसाहेत, पण आता शिंदेंनी नवा गौप्यस्फोट केलाय. आपले महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमचे फोन टॅप केले जात होते, असा दावा शिंदेंनी केलाय.
शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंकडून विधानसभेत आणि सार्वजनिक सभांमध्ये उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप केले गेलेत. भाजपनं २०१४ मध्ये शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं, पण मला द्यावं लागेल म्हणून घेतलं नाही, असं वारंवार एकनाथ शिंदे सांगतात.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाण्याला विरोध असूनही उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी केली, असंही एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाकडून सातत्यानं सांगितलं जातंय. याच आरोपांच्या मालिकेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता नवा आरोप केलाय. लोकसत्ता दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदेंनी हा गौप्यस्फोट केलाय.
“लाज वाटायला पाहिजे, बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली” : तानाजी सावंत










