Shiv Sena : ठाकरे-शिंदेंना अजून वाट बघावी लागणार! आयोगात आज काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shiv Sen symbol hearing in election commission :

ADVERTISEMENT

नवी दिल्ली : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलेलं आहे. खरी शिवसेना कुणाची? (Shiv Sena) धनुष्यबाण (bow and arrow) निवडणूक चिन्ह (election symbol) कोणाला मिळणार? यावर सध्या निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे.

यापूर्वी झालेल्या सुनावणीत शिवसेना (UBT) कडून बाळासाहेबांची शिवसेनाकडून करण्यात आलेल्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे हे पुन्हा एकदा कायदेशीर लढाई लढताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने आमचा गट खरी शिवसेना असल्याचा दावा केलेला आहे. त्याला शिवसेना (UBT) कडून आव्हान दिलं गेलं आहे. यापूर्वीच्या दोन सुनावण्यांमध्ये दोन्ही गटांकडून (ठाकरे गट आणि शिंदे गट) काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

हे वाचलं का?

आज निवडणूक आयोगात काय घडलं?

आजच्या सुनावणीमध्ये शिवसेना(UBT) च्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. यावेळी सिब्बल यांनी काही महत्वाचे मुद्दे आयोगासमोर मांडले.

  • प्रतिनिधी सभा,कार्यकारणीची प्रकिया आमच्याकडून पूर्ण झाली आहे

ADVERTISEMENT

  • शिंदे गट राजकीय पक्ष नाही

  • ADVERTISEMENT

  • शिंदेंनी राजकीय पक्षाबाबत कुठल्याही अटींची पूर्तता केलेली नाही

  • शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता आहे

  • ठाकरे गटच आहे खरी शिवसेना

  • 28 जिल्हाप्रमुखांनी प्रतिज्ञापत्रंच सादर केलेली नाहीत

  • शिवसेना पक्षात फूट पडली असं अजिबात म्हणता येणार नाही

  • लोकशाहीनुसार 16 आमदारांनी मतं का मांडली नाहीत?

  • मत न मांडता गुवाहटीला का गेले?

  • शिंदे गटाची कार्यपद्धती, संसदीय कार्यपध्दतीची खिल्ली उडवण्यासारखं

  • आम्ही जी कागदपत्रं सादर केली आहेत ती योग्य आहेत

  • प्रतिनिधी सभाच पक्ष चालवते

  • पक्ष सोडून गेलेले सदस्य सभेचा भाग होऊ शकत नाही

  • शिंदे गट शिवसेनेचा भाग नाहीत

  • आमच्या पक्षाची घटना कायदेशीर

  • प्रतिनिधी सभा आमच्या बाजूने आहे

  • आम्ही सर्व कारभार प्रतिनिधी सभेच्या माध्यमातूनच करतो

  • एकनाथ शिंदे हे मुख्य नेते नाहीत

  • एकनाथ शिंदे हे शिवसेनेत आधी कार्यरत होते

  • दोन्ही सभागृहांमध्ये आमचे संख्याबळ जास्त

  • राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या, अथवा निवडणूक घ्या

  • शिंदेंना घटना मान्य नाही तर पक्षाचं नेतेपद कोणत्या आधारावर?

  • नेता निवडीसाठी आणि सभा घेण्याची मुधा द्यावी

  • कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण होताच एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड. महेश जेठमलानी युक्तिवाद करण्यासाठी उभे राहिले. मात्र निवडणूक आयोगाने ठाकरेंचा युक्तिवाद आधी पूर्ण होऊदे म्हणतं जेठमलानी यांना थांबण्यास सांगितलं. त्यानंतर ठाकरे गटाचे दुसरे वकील देवदत्त कामत युक्तिवाद करण्यासाठी उभे राहिले.

    देवदत्त कामत यांचा युक्तिवाद :

    • राजकीय पक्ष म्हणून शिंदेंनी कागदपत्र सादर केली आहेत का?

    • राजकीय पक्ष म्हणून ठाकरे गटच योग्य

    • शिंदे गटाची प्रतिनिधी सभाच झाली नाही

    • शिंदे गटाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य

    • शिंदे गट राजकीय पक्ष नाही

    • सादिक अली प्रकरण इथे लागू होत नाही

    • शिंदे शिवसेनेते होते. शिवसेना बोगस असल्याचं ते म्हणू शकत नाही

    • पक्षप्रमुख पदाची मुदत संपण्याआधी सभेला परवानगी द्या

    • शिंदे गटाच्या तुलनेत आमच्याकडे संघटनात्नक संख्याबळ जास्त आहे

    • मूळ प्रतिनिधी सभा बरखास्त होऊ शकत नाही

    • शिंदेंचे मुख्य नेतेपद पक्षाच्या घटनेत नाही

    • शिंदेंचं मुख्य नेतेपद हे बेकायदेशीर आहे

    • मूळ पक्ष आमचाच,धनुष्यबाण चिन्ह आम्हालांच देण्यात यावं

    • पक्षाची घटनाच सर्वोच्च आहे

    • शिंदे गटाला कोणताही अधिकार न देता सभा घेण्यास परवानगी द्या

    • पक्षाच्या एबी फॉर्मवर आमदार निवडून आले, मग आता बेकायदेशीर कसे

    तर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड. महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. कामत यांच्या युक्तिवादावर जेठमलानींनी घेतला आक्षेप. प्रतिनिधी सभा फक्त ठाकरे गटाकडेच कशी असू शकते? असा सवाल जेठमलानींनी केला. कामत – जेठमलानी यांच्यात युक्तिवाद सुरू असताना वादही झाला. कामत- जेठमलानी यांच्या वादामध्ये निवडणूक आयोगाला करावी मध्यस्थी लागली.

    यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने अॅड. महेश जेठमलानी आणि अॅड. मनिंदर सिंग यांनी युक्तिवाद केला. या दोघांचाही युक्तिवाद १५ मिनिटांत संपल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना समोवारी (२३ जानेवारी) सविस्तर लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितलं आहे. त्यानंतर आयोगाने ३० जानेवारी रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. याच दिवशी आयोग शिवसेनेबाबतचा निकाल देण्याची शक्यता आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT