सरसंघचालक हेडगेवार यांनी नेताजींना भेट नाकारली होती, नितीन राऊतांच्या वक्तव्यामुळे नवा वाद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भास्कर मेहरे, प्रतिनिधी, यवतमाळ

ADVERTISEMENT

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेली वादग्रस्त वक्तव्य थांबण्याचं नाव घेत नाहीत. गेल्या आठ दिवसात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली. तो वाद शमतो ना शमतो तोच आता राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी संघाचे संस्थापक आणि सरसंघचालक हेडगेवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यात वादाची ठिणगी पडणार अशी चिन्हं आहेत.

हे वाचलं का?

काय म्हणाले नितीन राऊत?

सरसंघचालक हेडगेवार हे नाशिक येथे मुक्कामी असताना सुभाषचंद्र बोस यांनी भेटीच्या निमित्ताने आपल्या खासगी सचिवाला त्यांच्याकडे पाठवलं होतं. मात्र, हेडगेवार यांनी ब्रिटिश आपल्याला अटक करतील या भीतीने भेट नाकारली. असा दाखला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वणी येथील कार्यक्रमात बोलताना दिला. यांनीच जाती जातीत भांडण तंटे उभे केले आता तेच गुलाम लोक आज शिकवायला निघाले, या बद्दल चिंता व्यक्त केली. सरसंघचालक हेडगेवार यांनी1930 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात जंगल सत्याग्रह केला. आता करळगाव येथील जंगलात संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

‘ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं’, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुन्हा अडचणीत

ADVERTISEMENT

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. तो वाद शमतो ना शमतो तोच पुन्हा एकदा त्यांनी रविवारीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वादग्रस्त वक्तव्य केलं. याबाबत विचारलं असता सोमवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांना चांगल्या डॉक्टरांकडे दाखवण्याची गरज आहे असं म्हटलं होतं. चांगल्या डॉक्टरांकडे त्यांना दाखवण्याची गरज आहे त्याबाबत मी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना विनंती करेन असंही फडणवीस यांनी उपरोधाने म्हटलं होतं.

‘राजकारण कुठल्या थरावर आलंय?’ सुभाषचंद्र बोस यांनी नेहरूंना लिहिलेलं पत्र पोस्ट करत शशी थरूर म्हणाले…

आता उर्जामंत्री नितीन राऊत यांनी संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या या वक्तव्याला भाजपकडून काय उत्तर दिलं जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 23 जानेवारीपासून शिवसेना विरूद्ध भाजप असा वाद रंगतोच आहे. आता त्यात काँग्रेस विरूद्ध भाजप नेत्यांमध्ये वाद रंगणार ही चिन्हं आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT