पत्रकार विनोद दुवा यांच्यावरील देशद्रोहाचा गुन्हा सुप्रीम कोर्टाकडून रद्द
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पत्रकार विनोद दुवा यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला देशद्रोहाचा गुन्हा रद्द केला आहे. आपल्या यु-ट्यूब चॅनलच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे हिमाचल प्रदेशात स्थानिक भाजप नेत्याने दुवा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने प्रत्येक पत्रकाराला देशद्रोहाच्या प्रकरणात न्यायालयाकडून सुरक्षा मिळण्याचा अधिकार आहे. केदारनाथ सिंग प्रकरणाचा दाखला देत […]
ADVERTISEMENT
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पत्रकार विनोद दुवा यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला देशद्रोहाचा गुन्हा रद्द केला आहे. आपल्या यु-ट्यूब चॅनलच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे हिमाचल प्रदेशात स्थानिक भाजप नेत्याने दुवा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.
ADVERTISEMENT
गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने प्रत्येक पत्रकाराला देशद्रोहाच्या प्रकरणात न्यायालयाकडून सुरक्षा मिळण्याचा अधिकार आहे. केदारनाथ सिंग प्रकरणाचा दाखला देत जस्टीस यु.यु.ललित आणि जस्टीस विनीत सरन यांच्या खंडपीठाने शांतता भंग करण्याचा प्रयत्न, अराजकता पसरवण्याचा प्रयत्न अशा घटनांमध्येच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं स्पष्ट केलंय.
हिमाचल प्रदेशमध्ये विनोद दुवा यांच्याविरोधात IPC च्या १२४ अ, २६८, ५०१, ५०५ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्या यु-ट्यूब चॅनलच्या कार्यक्रमात विनोद दुवा यांनी पंतप्रधान मोदींवर अतिरेकी हल्ल्याचा वापर मतं मिळवण्यासाठी केला असं वक्तव्य केल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांनी केला होता. स्थानिक भाजप नेते अजय श्याम यांनी हा गुन्हा दाखल केला होता. परंतू सर्वोच्च न्यायालयाने दुवा यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT