राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?

मुंबई तक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून चौफेर टीका होत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी देखील राज्यपालांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून राज्याच्या प्रथम नागरिकांनी असं स्टेटमेंट देऊ नये, अशी प्रतिक्रिया दिली. भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यावर काय म्हणाले संभाजी राजे? काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह आता संभाजीराजेंनी देखील राज्यपालांच्या वक्तव्याला चुकीचे असल्याचे सांगितले. राज्यपाल हे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून चौफेर टीका होत आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी देखील राज्यपालांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून राज्याच्या प्रथम नागरिकांनी असं स्टेटमेंट देऊ नये, अशी प्रतिक्रिया दिली.

भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यावर काय म्हणाले संभाजी राजे?

काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह आता संभाजीराजेंनी देखील राज्यपालांच्या वक्तव्याला चुकीचे असल्याचे सांगितले. राज्यपाल हे राज्याचे प्रथम नागरिक आहेत, त्यांनी असे स्टेटमेंट द्यायला नको ज्याने महाराष्ट्राची सामाजिक रचना बिघडेल, असं संभाजीराजे म्हणाले. सोबतच राज्यपालांनी असे वक्तव्य टाळावीत, असं देखील संभाजीराजे (Sambhaji Raje) म्हणाले.

काय म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी?

“कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही” असं मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या व्हीडिओत बोलताना दिसत आहेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वादनिर्माण होऊ शकतो यात काहीही शंका नाही. त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी मुंबई आणि ठाण्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp