Shah Rukh Khan Son: EXCLUSIVE: NCB चे अधिकारी अचानक आर्यन खान समोर आले, अन्…
मुंबई: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमधील ड्रग्स पार्टीवर छापा मारल्यानंतर आता नवनवीन माहिती समोर येत आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दीर्घ चौकशीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि इतर आरोपींना अटक केली. त्याचबरोबर न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची कोठडीही सुनावली होती. खरं तर, छाप्यापूर्वी, एनसीबीला पक्की माहिती मिळाली होती की क्रूझवर ड्रग पार्टी होणार आहे. त्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यांनी जहाजाची तिकिटे […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमधील ड्रग्स पार्टीवर छापा मारल्यानंतर आता नवनवीन माहिती समोर येत आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दीर्घ चौकशीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि इतर आरोपींना अटक केली. त्याचबरोबर न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची कोठडीही सुनावली होती.
खरं तर, छाप्यापूर्वी, एनसीबीला पक्की माहिती मिळाली होती की क्रूझवर ड्रग पार्टी होणार आहे. त्यानंतर त्यांच्या अधिकाऱ्यांनी जहाजाची तिकिटे खरेदी केली आणि जेव्हा क्रूझचा प्रवास सुरु झाला तेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारुन आरोपींना अटक केली.
आर्यन खान नेमका कसा सापडला NCB च्या अधिकाऱ्यांना?
एनसीबीच्या सूत्रांनी इंडिया टुडेला अशी माहिती दिली की, क्रूझवर तब्बल 1300 ते 1400 लोक उपस्थित होते, परंतु एनसीबीला मिळालेल्या टीपनुसार त्यांना त्यातील 8 ते 10 लोकांना शोधायचे होते. खरं तर हे कठीण काम होतं. पण एनसीबीला त्यांच्या खात्रीलायक सूत्रांकडून क्रूझमधील रेव्ह पार्टीबाबत माहिती मिळाली होती. त्यातही आर्यन खानचे नाव अगदी स्पष्ट होते. आर्यन आणि अरबाज मर्चंटवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र एनसीबी अधिकारी नेमण्यात आले होते.