Exclusive: तांबे, पटोले की थोरात… अशोक चव्हाणांनी नेमकं कोणाला सुनावलं?
Ashok Chavan Interview: मुंबई: राज्यात विधान परिषद निवडणुकीनंतर (Vidhan Parishad Election) काँग्रेसमध्ये (Congress) फारच उलथापाल झाली आहे. सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष निवडून आल्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाना पटोलेंविरोधात (Nana Patole) नाराजी व्यक्त करत थेट काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस हायकमांडकडे देऊ केला. ज्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला. दरम्यान, या […]
ADVERTISEMENT

Ashok Chavan Interview: मुंबई: राज्यात विधान परिषद निवडणुकीनंतर (Vidhan Parishad Election) काँग्रेसमध्ये (Congress) फारच उलथापाल झाली आहे. सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष निवडून आल्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाना पटोलेंविरोधात (Nana Patole) नाराजी व्यक्त करत थेट काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस हायकमांडकडे देऊ केला. ज्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला. दरम्यान, या सगळ्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी मुंबई Tak ला एक विशेष मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी तांबे आणि पटोले या दोन्ही नेत्यांना खास आपल्या शैलीत सुनावल आहे. (exclusive interview tambe patole or thorat who exactly did ashok chavan say tough words to)
अशोक चव्हाण मुलाखतीत नेमकं काय म्हणाले?
‘सत्यजीत तांबेंना उमेदवारी देण्याविषयी कुणाचंही दुमत नव्हतं’
‘सत्यजीत तांबे यांच्या प्रकरणातील नेमकी सत्यता काय आहे हे अध्यक्ष आणि उमेदवारच सांगू शकतील.पण माझं मत आहे की, ही जागा काँग्रेसची होती. काँग्रेसच्या चिन्हावर सुधीर तांबे त्या ठिकाणी निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेसने दिलेली उमेदवारी नाकारणं हे उचित झालं नाही. दुसरा मुद्दा असा की, मुलाला द्यायचंच होतं तर मग कोणाचा विरोध होता? सत्यजीत तांबेंना उमेदवारी देण्याबाबत कोणाचंही दुमत नव्हतं.’
‘मला वाटतं तिथे नेमकं काय घडलं किंवा त्यांना अपक्ष फॉर्म का भरावा लागला याचे बारकावे काही मला माहित नाही. पण मला वाटतं ती जागा जी पक्षाची अधिकृत आली असती ती शेवटी अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. त्यात काँग्रेसचं नुकसान झालं आहे.’ अशा शब्दात अशोक चव्हाणांनी आपलं मत व्यक्त केलं.