Exclusive: संजय राऊतांच्या बोलण्यात का वाढलीय शिवीगाळ?, राऊत म्हणाले..
Sanjay Raut Exclusive Interview: मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (6 मार्च) मुंबई Tak ला विशेष मुलाखत दिली. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊतांच्या अनेक भाषणात शिवराळ भाषेचा वापर होत असल्याचं अवघ्या महाराष्ट्राला (Maharashtra) पाहायला मिळालं आहे. संजय राऊतांच्या भाषणांमध्ये शिव्या का वाढल्या आहेत. याबाबत त्यांनी स्वत: आपलं मत […]
ADVERTISEMENT

Sanjay Raut Exclusive Interview: मुंबई: शिवसेना (UBT) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (6 मार्च) मुंबई Tak ला विशेष मुलाखत दिली. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊतांच्या अनेक भाषणात शिवराळ भाषेचा वापर होत असल्याचं अवघ्या महाराष्ट्राला (Maharashtra) पाहायला मिळालं आहे. संजय राऊतांच्या भाषणांमध्ये शिव्या का वाढल्या आहेत. याबाबत त्यांनी स्वत: आपलं मत व्यक्त केलं आहे.
मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत नेमकं काय म्हणाले:
‘गेल्या 40-45 वर्षांपासून मी लिखाण करतोय. माझ्या लिखाणात मी अशाप्रकारची भाषा मी कधी वापरलीए ते. माझी भाषा स्वच्छ, स्पष्ट पण परखड आहे. अशा शिव्यांचा वापर आपल्या संत-साहित्यात खूप आहे. असे अनेक अभंग मला माहित आहे आणि मी संतसाहित्याचा सुद्धा अभ्यासक आहे.’
‘संपूर्ण काळात तीन वेळाच प्रसंग घडला… निवडणूक आयोगाला मी ठरवून दिली शिवी. जर ती शिवी असेल तर ती ठरवून दिली. कारण ती लोकभावना आहे. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने निकाल विकला. बाळासाहेबांची शिवसेना अशी उचलून दुसऱ्याच्या हातात दिली. हा लोकभावनेचा उद्रेक आहे. मी कशाला महाराष्ट्रच शिव्या घालतोय.’
‘मी एकदा किरीट सोमया या माणसाला चु$#@ म्हटलं होतं. हा बोली भाषेतला शब्द आहे ही शिवी नाही. तुम्ही डिक्शनरी काढून पाहा.. रोज असे शब्द वापरातत बोली भाषेत. त्याच अर्थ डिक्शनरीमध्ये पाहिला तर तो असंसदीय नाही. विंचवाला चपलेनेच चिरडावा लागतो.’