बापरे! गोंदियात ST मध्ये तिकिट व्हेडिंग मशीनचा स्फोट, महिला वाहकाच्या हाताला दुखापत

मुंबई तक

गोंदियामध्ये एसटीच्या तिकीट व्हेंडिग मशीनचा स्फोट झाल्याने महिला वाहकाच्या हाताला दुखापत झाली आहे. या मशीनसंदर्भात अनेक तक्रारी समोर आलेल्या असतानाच ही गंभीर घटना घडल्याने वाहकांमध्ये भीती पसरली आहे. या मशीनमुळे वाहकांसोबत प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. गोंदियात प्रवाशांना तिकीट दिल्यानंतर रूट बदल करीत असताना तिकीट मशीनमध्ये स्फोट होऊन कर्तव्यावर असलेली महिला वाहक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गोंदियामध्ये एसटीच्या तिकीट व्हेंडिग मशीनचा स्फोट झाल्याने महिला वाहकाच्या हाताला दुखापत झाली आहे. या मशीनसंदर्भात अनेक तक्रारी समोर आलेल्या असतानाच ही गंभीर घटना घडल्याने वाहकांमध्ये भीती पसरली आहे. या मशीनमुळे वाहकांसोबत प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता झाली आहे.

गोंदियात प्रवाशांना तिकीट दिल्यानंतर रूट बदल करीत असताना तिकीट मशीनमध्ये स्फोट होऊन कर्तव्यावर असलेली महिला वाहक गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदियाच्या मुख्य बसस्थानक परिसरात घडली. महिला वाहकाचा केवळ पंजा भाजला असून सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र त्या महिला वाहकाचे हात निकामी झाला आहे. कल्पना मेश्राम वय ३६ वर्ष असे जखमी महिला वाहकाचे नाव आहे.

दरम्यान, या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात सदर महिला वाहकाने तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे एसटीच्या वाहकाजवळील तिकिट व्हेडिंग मशीन जिवंत बॉम्ब ठरत असल्याचे सिद्ध झाले असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा मॅन्युअल तिकिट पद्धत चलनात आणून इलेक्ट्रॉनिक तिकिट मशीन बंद करण्याची मागणी समोर आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp