आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणीची मागणी; बाबा मिसाळांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई तक

पुणे: पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणी मागण्यात आली आहे. खंडणी नाही दिली तर तर त्यांचा दीर बाबा मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. बाबा मिसाळ आणि माधुरी मिसाळ यांच्या दोघांच्या मोबाईलवरती मेसेज करुन दोन ते पाच लाख रुपये मागण्यात आले आहेत. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पुणे: पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे खंडणी मागण्यात आली आहे. खंडणी नाही दिली तर तर त्यांचा दीर बाबा मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. बाबा मिसाळ आणि माधुरी मिसाळ यांच्या दोघांच्या मोबाईलवरती मेसेज करुन दोन ते पाच लाख रुपये मागण्यात आले आहेत. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी दररोज फोन करुन देतो त्रास

इमरान समीर शेख या व्यक्तीनं बाबा मिसाळा यांच्या मोबाईलवर तसेच आमदार माधुरी मिसाळ यांच्या जनसंपर्कासाठी ठेवलेल्या मोबाईलवरती मेसेज करुन खंडणीची मागणी केली. आरोपीनं गुगल पे द्वारे पैसे पाठवण्याची मागणी केली आहे. जर पैसे नाही दिले तर बाबा मिसाळ यांना मारण्याची धमकी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. संबंधित आरोप दररोज फोनवरती मेसेज करुन त्रास देत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. दरम्यान यानंतर आरोपीला पुण्यातील घोरपडी भागातून ताब्यात घेतलं आहे, तसंच आरोपीवरती याअगोदरही गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे. बिबवेवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

माधुरी मिसाळ कोण आहेत?

माधुरी मिसाळ या भाजपच्या पर्वती विधानसभा मतदार संघातून सलग तीनवेळा निवडूण आलेल्या आहेत. काँग्रेसच्या रमेश बागवे यांना हारवून सर्वप्रथम त्या 2009 मध्ये आमदार झाल्या होत्या. 2007 ते 2012 या कालावधीमध्ये त्या पुणे महानगरपालिकेत नगरसेवक होत्या. सचिव, भाजपा महाराष्ट्र, माजी अध्यक्ष, विद्या सहकारी बँक लि., संचालक, उद्यम सहकारी बँक लि अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्या निभावत आहेत. निर्मला सीतारामन सध्या बारामती दौऱ्यामध्ये आहेत त्यामध्ये माधुरी मिसाळ यांचा सक्रिय सहभाग आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp