कथित स्टिंग ऑपरेशनमधील प्रचंड खळबळजनक Video, फडणवीसांच्या टार्गेटवर आता थेट शरद पवार?
मुंबई: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (8 मार्च) थेट विधानसभेतच एक स्टिंग ऑपरेशन सादर केलं. यामध्ये त्यांनी सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांचं संपूर्ण स्टिंग ऑपरेशन केलं आहे. ज्याच्या आधारे आता फडणवीसांनी एक प्रकारे थेट शरद पवारांवरच निशाणा साधला आहे. याच कथित स्टिंग ऑपेशनमधील काही व्हीडिओ हे अत्यंत खळबळजनक आहेत. ज्यामध्ये अनेकदा शरद पवार […]
ADVERTISEMENT

मुंबई: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (8 मार्च) थेट विधानसभेतच एक स्टिंग ऑपरेशन सादर केलं. यामध्ये त्यांनी सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांचं संपूर्ण स्टिंग ऑपरेशन केलं आहे. ज्याच्या आधारे आता फडणवीसांनी एक प्रकारे थेट शरद पवारांवरच निशाणा साधला आहे. याच कथित स्टिंग ऑपेशनमधील काही व्हीडिओ हे अत्यंत खळबळजनक आहेत. ज्यामध्ये अनेकदा शरद पवार यांचा उल्लेखही आला आहे.
भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर 2018 सालच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील एका वादाप्रकरणी पुणे पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केला. या प्रकरणात मोक्का लावण्यात यावा अशी कागदपत्र तयार केली. ही सर्व कारवाई विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या सांगण्यावरुन झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला. पण याचवेळी हे काही वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरुन झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पाहा काही खळबळजनक व्हीडिओ संवाद:
कथित स्टिंग ऑपरेशनमधील काही खळबळजनक Video
(व्हीडिओ 2)