कोरोनावरील लस घ्यायला जाताय, पण तुमच्या जिल्ह्यात आहे की नाही हे तर पाहा!
मुंबई: महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसींचा (corona vaccine) मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई, पनवेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, बुलडाणा या शहरातली लसीकरण मोहिम थंडावली आहे. अशातच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार (Maharashtra Govt) यांच्यामध्ये कोरोनावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे कुणी लस देता का लस? अशी वेळ महाराष्ट्र सरकारवर ओढावली आहे. (fact check is there a […]
ADVERTISEMENT
मुंबई: महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसींचा (corona vaccine) मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई, पनवेल, सातारा, सांगली, कोल्हापूर, बुलडाणा या शहरातली लसीकरण मोहिम थंडावली आहे. अशातच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार (Maharashtra Govt) यांच्यामध्ये कोरोनावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे कुणी लस देता का लस? अशी वेळ महाराष्ट्र सरकारवर ओढावली आहे. (fact check is there a corona vaccine in your district)
ADVERTISEMENT
याच पार्श्वभूमीवरच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे. सक्रीय रूग्णसंख्याही देशात सर्वाधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जास्त लसींचा पुरवठा करण्याची गरज आहे. पण 6 कोटी लोकसंख्येच्या गुजरातला 1 कोटी लसी आणि 12 कोटी लोकसंख्येला महाराष्ट्राला 1.4 कोटी लसी असा भेदभाव का? असा सवाल महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विचारला आहे.
लसींचा पुरवठा वाढवण्याची मागणी आरोग्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. पण दुसरीकडे राज्यातील अनेक नेते हे केंद्र सरकार महाराष्ट्राशी भेदभाव करत असल्याची टीका करत आहे. अधिक माहितीसाठी बघा मुंबई तकवरची ही लाईव्ह चर्चा. त्यामुळे सध्या राज्यात लसींबाबत नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा आणि ती माहिती आपल्यासमोर मांडण्याचा ‘मुंबई तक’ने प्रयत्न केला आहे.
हे वाचलं का?
महाराष्ट्रच नव्हे तर ‘या’ राज्यातही बेड्सबाबत गंभीर स्थिती, पाहा एक विशेष रिपोर्ट
महाराष्ट्रात कुठे किती लसींचा साठा आहे?
1. सांगली – शिल्लक डोस: 0
ADVERTISEMENT
एकूण लसीकरण: 2,60,000
ADVERTISEMENT
2. रायगड- शिल्लक डोस: 28,420
एकूण लसीकरण: 1,15,358
3. गोंदिया- शिल्लक डोस: 0
एकूण लसीकरण: 1,03,041
4. सातारा- शिल्लक डोस: 0
एकूण लसीकरण: 2,80,719
5. अहमदनगर- शिल्लक डोस: 12,000
एकूण लसीकरण: 2,74,000
6. वाशिम- शिल्लक डोस: 33,600
एकूण लसीकरण: 82,000
7. नवी मुंबई- शिल्लक डोस: 3200
एकूण लसीकरण: 14,179
8. उस्मानाबाद- शिल्लक डोस: 16,790
एकूण लसीकरण: 71,026
9. सोलापूर- शिल्लक डोस: 25,590
एकूण लसीकरण: 2,61,258
10. कोल्हापूर- शिल्लक डोस: 19,000
एकूण लसीकरण: 12,14,421
11. यवतमाळ- शिल्लक डोस: 4,000
एकूण लसीकरण: 1,39,000
12. पिंपरी-चिंचवड- शिल्लक डोस: 0
एकूण लसीकरण: 2,51,320
दरम्यान मुंबई, ठाणे, अमरावती आणि नाशिकमध्ये देखील चार ते पाच दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे.
पाहा कोणकोणत्या राज्यात आत्तापर्यंत किती लसीकरण झालंय:
1. महाराष्ट्र – एकूण डोस- 92,63,537
पहिला डोस – 83,65,730
दुसरा डोस – 8,97,807
2. गुजरात – एकूण डोस – 84,01,800
पहिला डोस – 74,38,163
दुसरा डोस – 9,63,637
3. उत्तर प्रदेश – एकूण डोस – 80,90,098
पहिला डोस – 68,99,767
दुसरा डोस – 11,90,331
4. मध्य प्रदेश – एकूण डोस – 51,75,245
पहिला डोस – 45,94,19
दुसरा डोस – 5,81,046
5. हरयाणा – एकूण डोस – 21,04,653
पहिला डोस – 19,26,435
दुसरा डोस – 1,78,218
ही स्थिती तर फक्त लसींबाबतची आहे. पण अनेक ठिकाणी बेड्स उपलब्ध नाहीत, रेमडेसिविर इन्जक्शन उपलब्ध नाहीत अशीही स्थिती निर्माण झालीय त्यामुळे महाराष्ट्रातली कोरोना स्थिती खरंच गंभीर आहे, हे यातून स्पष्ट होतंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT