रशियाने भारताच्या विनंतीवरून सहा तास युद्ध थांबवलं?; सत्य नेमकं काय?
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. युक्रेनमधील अनेक नागरिकांनी दुसऱ्या देशांत स्थलांतर केलं असून, युद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी (३ मार्च) रशियाने भारताच्या विनंतीवरून खार्किव्हमध्ये काही तासांसाठी युद्ध थांबवल्याचं वृत्त व्हायरल झालं. या वृत्तावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने खुलासा केला आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष अजून सुरूच आहे. दिवसेंदिवस […]
ADVERTISEMENT

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. युक्रेनमधील अनेक नागरिकांनी दुसऱ्या देशांत स्थलांतर केलं असून, युद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी (३ मार्च) रशियाने भारताच्या विनंतीवरून खार्किव्हमध्ये काही तासांसाठी युद्ध थांबवल्याचं वृत्त व्हायरल झालं. या वृत्तावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने खुलासा केला आहे.
रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष अजून सुरूच आहे. दिवसेंदिवस दोन्ही देशांतील संघर्ष वाढतच असून, रशियाकडून युक्रेनमधील हल्लेही वाढले आहेत. २४ फेब्रुवारी रोजी रशियाने अचानक आक्रमण केल्यानं युक्रेनमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. अचानक सुरू झालेल्या हल्ल्यामुळे अनेक नागरिक कीव्ह, खार्किव्हसह युक्रेनमधील अनेक शहरांत अडकून पडले. यात भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
उद्या पुतिनना आदेश द्या असं सांगाल,आम्ही युद्ध थांबवा असं सांगू शकतो का?- सरन्यायाधीश रमण्णा
The Russians apparently agreed to a six hour window for allowing safe passage to all Indians in Kharkiv before an all-out assault begins tonight . The deadline is 2130 IST, about 3 hours from now. #UkraineWar
— Nitin A. Gokhale (@nitingokhale) March 2, 2022
मागील आठ दिवसांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू असून, युक्रेन शेजारील राष्ट्रांमध्ये दाखल होणाऱ्या भारतीयांना मायदेशी आणलं जात आहे. याच दरम्यान, गुरूवारी पंतप्रधान मोदींच्या विनंतीवरून रशियाने खार्किव्हमध्ये सहा तासांसाठी युद्ध थांबवल्याचं वृत्त सोशल मीडियाद्वारे पसरलं. अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी मार्ग करून देण्यात आल्याचंही सांगितलं गेलं. अनेकांनी याबद्दल ट्विटही केले आहेत. पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याशी बोलून युद्ध सहा तासांसाठी थांबवलं, असं काही जणांनी ट्विट करून म्हटलं. मात्र, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबद्दल वेगळाच खुलासा केला.