सिनेसृष्टीतील ‘या’ जोडप्यांनी चाहत्यांना दिलाय घटस्फोटाचा ‘शॉक’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

सिनेसृष्टीतील कलाकारांचं रिलेशनशिप नेहमीच चर्चेचा विषय असतो. सिनेसृष्टीतील अनेक जोडप्यांमधील नाती गॉसिपचा विषय ठरतात. सिनेसृष्टीतील अनेक कलाकाराच्या जोड्या जशा त्यांच्या एकत्र येण्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या. तशाच त्यांचं विलग होणंही मोठा विषय ठरला आहे.

हे वाचलं का?

सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी एकमेकांसोबत संसार थाटला. अनेक वर्षे त्यांचा संसार चाललाही, पण अचानक या कलाकारांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर करत चाहत्यांना धक्का दिला. चित्रपटसृष्टीतील घटस्फोट घेतलेल्या जोडप्यांविषयी जाणून घेऊयात…

ADVERTISEMENT

दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेता धनुषने घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. धनुषने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ऐश्वर्या रजनीकांतपासून विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. एश्वर्या आणि धुनषचा संसार १८ वर्ष चालला. धनुषच्या चाहत्यांसाठी हा एक धक्काच ठरला.

ADVERTISEMENT

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खान आणि किरण रावनेही १५ वर्ष संसार केल्यानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ३ जुलै २०२१ रोजी आमिर खान आणि किरण रावने एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत घटस्फोटाची घोषणा केली होती.

अभिनेता ह्रतिक रोशन आणि सुजैन खान हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपंही विभक्त झालं. १४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर ह्रतिक आणि सुजैननं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक राहिलेल्या अरबाज खान आणि मलायका अरोरानेही अचानक घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. तब्बल १८ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अरबाज आणि मलायकाने १२ डिसेंबर १९८८ रोजी लग्न केलं होतं. २०१७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

अभिनेता आणि दिग्दर्शक असलेल्या फरहान अख्तरनेही १५ वर्षे संसार केल्यानंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. फरहान अख्तरने अधुना भवानीसोबत विवाह केला होता. २०१७ मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

अभिनेता अर्जून रामपाल आणि मेहर जेसिया यांनीही २० वर्ष संसार केल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मात्र धक्का बसला होता.

आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत राहणाऱ्या अनुराग कश्यप आणि अभिनेत्री कल्कि कोचलीनही काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर घटस्फोट घेतला. देव डी सिनेमावेळी कल्की आणि अनुराग प्रेमात पडले. २०११ मध्ये दोघांनी लग्न केलं, पण फार काळ टिकलं नाही. २०१५ मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय जोडपं ठरलेल्या समांथा आणि नागा चैतन्याच्या घटस्फोटाचीही बरीच चर्चा झाली. चार वर्ष सोबत राहिल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावरून घटस्फोट घेत असल्याची घोषणा दोघांनी केली होती. समांथा आणि नागा चैतन्याने २०१७ मध्ये लग्न केलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT