अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात घुसला चाहता, वडिलांवर चाकूहल्ला
पुणे: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Actress Sonali Kulkarni) हीने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लग्न केलं असल्याची माहिती देत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मात्र, असं असताना दुसरीकडे सोनाली कुलकर्णी हिच्या पुण्यातील (Pune) घरात काल (24 मे) रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री पुण्यातील सोनालीचा एक चाहता (Fan) अचानक […]
ADVERTISEMENT

पुणे: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Actress Sonali Kulkarni) हीने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लग्न केलं असल्याची माहिती देत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मात्र, असं असताना दुसरीकडे सोनाली कुलकर्णी हिच्या पुण्यातील (Pune) घरात काल (24 मे) रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री पुण्यातील सोनालीचा एक चाहता (Fan) अचानक तिच्या घरात घुसला. यावेळी सोनालीच्या वडिलांनी त्याला घराबाहेर जाण्यास देखील सांगितलं. मात्र, त्याने आपल्या जवळील चाकूने त्यांच्यावरच वार केले. सुदैवाने या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे सोनालीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत आपण कोणतीही तक्रार करणार नसल्याचं सोनाली कुलर्णीच्या वडिलांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितलं आहे.
नेमकं काय घडलं?