FASTag ची कटकट संपणार, नंबरप्लेटद्वारे होणार टोल टॅक्सची वसुली, गडकरींनी सांगितली योजना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशातली FASTag ची कटकट संपणार आहे. तसंच टोल प्लाझावर आता टोलवसुलीसाठी नंबर प्लेटचा वापर केला जाईल. सरकार नॅशनल हायवेवरून ऑटोमॅटिक नंबर प्लेट द्वारे टोल टॅक्स वसुली करण्याच्या योजनेवर काम करतं आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. केंद्रीय रस्ते, परिवहन तसंच राजमार्ग मंत्री असलेल्या गडकरींनी या संदर्भात माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

FASTag च्या ऐवजी नंबरप्लेटद्वारे होणार टोलवसुली

बिझनेस स्टँडर्ड मध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार सध्या FASTag द्वारे टोलवसुली केली जाते आहे. मात्र लवकरच ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडर कॅमेरे हे काम करणार आहेत. कॅमेरे लावलेली ही मशीन ऑटोमॅटिक रिडरद्वारे नंबर प्लेटचं रिडिंग घेतील आणि त्याद्वारे टोलवसुली केली जाईल. हे पैसे ग्राहकाच्या बँक अकाऊंटमधून कट होतील

नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती देताना हे सांगितलं की या योजनेच्या पायलेट प्रोजेक्टवर काम करतो आहे. ही योजना अंमलात आणण्याआधी त्यामधले कायदेशीर खाचखळगेही तपासले जातील. त्यानंतर ही योजना लागू केली जाईल.

हे वाचलं का?

नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?

नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार टोल प्लाझावर आता नंबर प्लेट रिडर कॅमेरे लावले जातील. त्यासंदर्भातली तयारी सुरू करण्यात आली आहे. जी कार किंवा जे वाहन यासमोरून जाईल त्याचा नंबर हे मशीन टीपणार आहे. त्यानंतर टोल टॅक्स वसुली ग्राहकाच्या बँक अकाऊंटमधून पैसे वजा होतील.

नितीन गडकरी म्हणाले की या योजनेत काही अडचणीही येत आहेत. त्या अडचणी दूर करण्याचं काम आम्ही करतो आहोत. उदाहरणार्थ नंबर प्लेटशिवाय आणखी काही लिहिलं गेलं असेल तर ती नंबर प्लेट रिड करण्यात अडचणी येऊ शकतात. मात्र या अडचणी दूर करण्यासंदर्भात आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत असं गडकरींनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

नितीन गडकरी म्हणाले की या योजनेत आणखी एक मोठी अडचण अशी आहे की जो टोल टॅक्स देणार नाही त्या ड्रायव्हरला दंड कसा ठोठावणार? कारण टोल टॅक्स बुडवणाऱ्याला शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात नाही. या सगळ्या गोष्टी कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी आम्ही प्रय़त्न करतो आहोत. ज्या कारवर योग्य नंबर प्लेट नाहीत त्या योग्य पद्धतीने बसवण्यासाठी आम्ही कार मालकांना, चालकांना मुदत देणार आहोत.

ADVERTISEMENT

सरकारने टोल टॅक्सच्या कपातीसाठी FASTag योजना आणली. त्यामुळे टोल नाक्यांवर वाहनांचा वेळ वाचू लागला. मोठ्या रांगांमधूनही कार चालकांना, मालकांना दिलासा मिळाला. मात्र फास्टॅग आल्यानंतर काही फायदेही झाले आणि काही तोटेही झाले आहेत. जर फास्टॅग मध्ये बॅलन्स कमी असेल तर वेळही जास्त जाऊ लागला. अनेक ठिकाणी कनेक्टिव्हिटीचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेही वेळ जात होता. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आता नवी योजना सरकार आणतं आहे अशी माहिती गडकरींनी दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT