उस्मानाबाद : कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जिवाशी खेळ, उपचारासाठी बनावट गोळ्यांचा वापर
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जिवाशी गंभीर खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या फेव्हीमॅक्स या गोळ्या बनावट असून कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टार्चचा या गोळ्या तयार करण्यासाठी वापर होतो. अन्न-औषध विभागाने केलेल्या कारवाईत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या गोळ्या तयार करणारी कंपनी ही अस्तित्वातच नसल्याचंही समजतंय. […]
ADVERTISEMENT
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जिवाशी गंभीर खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या फेव्हीमॅक्स या गोळ्या बनावट असून कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टार्चचा या गोळ्या तयार करण्यासाठी वापर होतो. अन्न-औषध विभागाने केलेल्या कारवाईत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या गोळ्या तयार करणारी कंपनी ही अस्तित्वातच नसल्याचंही समजतंय.
ADVERTISEMENT
कोरोनाच्या काळात बनावट औषधं आणि इंजेक्शन तयार करण्याचं काम मोठ्या प्रमाणात होत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत FDA ने जप्तीची एक कारवाई केली. यात बनावट गोळ्यांच्या साठ्याचे धागेदोरे हे थेट उस्मानाबादपर्यंत पोहचत असल्याचं निष्पन्न झालं. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील शिवसृष्टी सर्जीमेड, मेडीटेब वर्ल्डवाईड, नीरव ट्रेडलिंग या वितरकांकडे बनावट गोळ्यांचा साठा सापडला.
हे वाचलं का?
यावेळी FDA ला यामधील काही गोळ्या या उस्मानाबादेतील उमरगा आणि काही ठिकाणी विक्री झाल्याचं कळलं. या गोळ्यांमध्ये कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टार्चचा वापर होतो असंही FDA च्या लक्षात आलं. गोळ्या बनवणारी कंपनी मॅक्स रिलीफ हेल्थकेअर ही हिमाचल प्रदेशमध्ये सोलन भागात असल्याचं दाखवण्यात येत होतं. परंतू अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता ही कंपनी मुळात अस्तित्वातच नसल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे फेविमॅक्स गोळ्यांवर तात्काळ बंदी घालण्यात आल्याचे आदेश अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्ष विलास दुसाने यांनी दिलेत.
ADVERTISEMENT
उमरगा येथे ३०० तर उस्मानाबादच्या विविध भागात २२० असा ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT