शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये राडा; शाखेतून काढलेले फोटो लावलेच!

मुंबई तक

मिथीलेश गुप्ता डोंबिवली: शिवसेनेच्या (Shivsena) डोंबिवली मध्यवर्ती शाखेत जोरदार राडा झाला आहे. शिवसेना कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांमध्ये हा राडा झाला आहे. शिंदे समर्थक शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत घुसले आणि शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोटो लावला. यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत. ठाकरे समर्थक विरूद्ध शिंदे समर्थक यांचा डोंबिवलीच्या शिवसेना शाखेत राडा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मिथीलेश गुप्ता

डोंबिवली: शिवसेनेच्या (Shivsena) डोंबिवली मध्यवर्ती शाखेत जोरदार राडा झाला आहे. शिवसेना कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांमध्ये हा राडा झाला आहे. शिंदे समर्थक शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत घुसले आणि शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोटो लावला. यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत.

ठाकरे समर्थक विरूद्ध शिंदे समर्थक यांचा डोंबिवलीच्या शिवसेना शाखेत राडा

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो या शिवसेना शाखेतून काढण्यात आले होते. यामुळे शिंदे गटाचे समर्थक आक्रमक झाले आणि शिंदे गटातील 400 ते 500 जणांनी शिवसेना शाखेत घुसून शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला शिवसैनिक, तरुण आणि पुरुष शिवसैनिक असे सगळ्याच वयोगटातील शिवसैनिक आणि शिंदे समर्थक आपआपसात भिडले आहेत.

रामनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली आणि एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली, तसेच पत्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याठिकाणी डोंबिवली पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp