दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दहावी आणि बारावीचज्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यासंबंधीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मेच्या दरम्यान तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मेच्या दरम्यान होणार आहे. या वेळापत्रकात बदल होणार नाही त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केलं आहे.

दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा आणि तोंडी परीक्षा यांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केलं जाणार आहे. परीक्षेपूर्वी राज्य शिक्षण मंडळाकडून राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना याची माहिती सविस्तरपणे दिली जाणार आहे. शिक्षण मंडळाने जाहीर केलेले दहावी आणि बारावीचे वेळापत्रक हे www.mahahsscboard.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार का? ऑनलाईन होणार की ऑफलाईन पद्धतीने होणार? हे आणि असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात होते. आत्ता याची उत्तरं मिळाली आहेत कारण दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं टाईमटेबल जाहीर झालं आहे तसंच त्यात कोणताही बदल होणार नाही हेदेखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्य शिक्षण मंडळाने दोन आठवड्यांपूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्या वेळापत्रकाची माहिती मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर यासंबंधी पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांच्या काही सूचना मागवण्यात आल्या होत्या ज्यानंतर वेळापत्रक नक्की करण्यात आलं. व्हॉट्स अॅप आणि अन्य सोशल मीडियाद्वारे व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये असंही आवाहन करण्यात आलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT