रशिया-युक्रेन संघर्षावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली चिंता, म्हणाल्या….

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झालं आहे. गुरूवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस युद्धाचे भयंकर परिणाम दाखवणारे ठरले. अशात रशियन सैन्याची आगेकूच सुरू आहे. शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आलं. मोक्याचं विमानतळही ताब्यात घेतल्याचा दावा रशियाच्या लष्कराने केला आहे. दोन्ही देशांमधला संघर्ष युद्धात परिवर्तित झाला आहे. या सगळ्या परिस्थितीवर भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

रशिया-युक्रेन संघर्षाची धग कायम; हवाई हल्ल्यांच्या कल्लोळात चर्चेच्या हालचाली

काय म्हणाल्या निर्मला सीतारामन?

हे वाचलं का?

दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांतता पसरली आणि जगाला अशा आव्हानांचा सामना कधीच करावा लागला नाही. परंतू अलीकडील काही घटनांमुळे भारताचा विकास आव्हानात्मक झाला आहे. जगात निर्माण होणाऱ्या नवनवीन आव्हानांमुळे भारताच्या विकासाला आव्हान मिळणार आहे, अशी भीती व्यक्त करत जागतील शांतता धोक्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने अशाप्रकारची गंभीर परिस्थिती अनुभवलेली नाही.

रशिया आणि युक्रेनमधील तणावाचा जागतिक आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम होताना दिसून येत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अशा प्रकारचा तणाव कधीही पाहिला नव्हता. कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरत असताना आणखी एक नवीन संकट परवडणारे नाही. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीने शंभरी पार केलीये. तसेच पुरवठा साखळी देखील खंडित झाली आहे. वस्तुंचा पुरवठा योग्यप्रमाणात न झाल्यास महागाई वाढण्याची शक्यता आहे. या युद्धाचे अर्थव्यवस्थेवर अनेक नकारात्मक परिणाम होताना दिसून येत आहेत असंही त्या म्हणाल्या.

ADVERTISEMENT

‘रशिया-युक्रेन युद्ध’ थांबवण्यासाठी मोदी प्रयत्न करताहेत; हेमा मालिनींचा दावा

ADVERTISEMENT

रशियाने युक्रेनला पूर्व, उत्तर आणि दक्षिणेकडून घेरले असून रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या जवळ पोहोचले आहे. किव्ह शहरात स्फोटांचे आवाज आले असले तरी रशियाने मात्र किव्हवर हल्ला केला नसल्याचे स्पष्ट केले. वृत्तसंस्थांच्या वृत्तानुसार, किव्ह येथे पाडण्यात आलेले विमान युक्रेनचे होते, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले, तर ते विमान रशियाचे असल्याचा दावा युक्रेनने केला.

गुरुवारी पहाटे रशियाने आक्रमण केल्यापासून युक्रेनच्या काही सैनिकांसह १३७ जण ठार आणि ३१६ जण जखमी झाले, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी गुरुवारी उशिरा दिली. रशियाने राजधानी किव्हसह अन्य शहरांवर हवाई हल्ले केल्यामुळे युक्रेनमधील हजारो लोक सुरक्षिततेसाठी पश्चिमात्य देशांमध्ये पळून जात आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT