भाजप आमदाराचा भाऊ अडचणीत; ब्रम्हानंद पडळकरांसह १०० जणांवर पोलिसांची कारवाई
मिरज : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडले आणि ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर रस्त्याला लागून असलेले […]
ADVERTISEMENT
मिरज : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडले आणि ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर रस्त्याला लागून असलेले दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोअर्स, ट्रॅव्हल ऑफिस, एक घर, पान शॉप अशा दहा मिळकती शनिवारी मध्यरात्री पाडण्यात आल्या. यासाठी मध्यरात्री पोकलेनच्या सहाय्याने शेकडो लोकांचा जमाव घेऊन ब्रम्हानंद पडळकर हे आले होते, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज रोडवर काही आस्थापना पोकलेनच्या मदतीने तोडत असल्याची माहिती मिळाली. पण पोलीस घटनास्थळी येताच ड्रायव्हर आणि इतर सर्व लोकं पोकलेन सोडून पळून गेले. त्यांनी जवळपास दहा आस्थापनांचे तोडून नुकसान केलं होतं. या आस्थापना धारकांपैकी विशाल सन्मुख यांनी तक्रार दिली.
हे वाचलं का?
या तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलं की, ब्रम्हानंद पडळकर आणि इतर १०० लोक आले आणि त्यांनी जबरदस्तीने त्यांच्या व्यवस्थेमध्ये अतिक्रमण करून सर्व वास्तूंची तोडफोड केलेली आहे. याच तक्रारीवरुन ब्रम्हानंद पडळकर आणि इतर १०० लोकांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमविणे, खाजगी प्रॉपर्टीमध्ये अतिक्रमण करणे, खाजगी प्रॉपर्टीचे नुकसान करणे, जीवितास धोका उत्पन्न होईल असे कृत्य करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय घटनास्थळावरून चार पोकलेनही जप्त केलेले आहेत. पुढील चौकशी चालू आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी नेमका काय गुन्हा दाखल झाला याची माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हा विषय नीटपणे समजून घ्यायला हवा. मिरजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज रोडवर नॅशनल हायवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. यासोबतच एक महिन्यापासून त्या रस्त्यावरील अतिक्रमाला काढायचं काम महानगरपालिकेच्या वतीने चालू आहे.
ADVERTISEMENT
महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त आणि अतिक्रमण विभागाचे प्रमु मागील महिन्याभरापासून त्या रस्त्यावरची सर्व अतिक्रमण काढत आहेत. माझे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या नावावर मिरज स्टॅन्डच्या समोरचा ५१ गुंठ्याचा प्लॉट आहे, त्या प्लॉटमध्येसुद्धा अतिक्रमण आहे. या अतिक्रमाणाच्या बाबत सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने वारंवार या लोकांना सूचना दिल्या होत्या की तुम्ही अतिक्रमण काढून. दोन ते तीन वेळा त्यांचे अधिकारी येऊन गेले त्यांची वादावादी झाली.
ADVERTISEMENT
त्यानंतर मागील महिन्यातील 16 तारखेला ब्रह्मानंद पडळकर यांना एक नोटीस काढलं आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं की 24 तासाच्या अतिक्रमण काढून घ्या. परंतु आणि त्या आस्थापना आणि त्यांच्या मालकांना निरोप दिला की महानगरपालिकेचे नोटीस आले तर तुमच्या पद्धतीने काढून घ्या. नंतर महानगरपालिकेला परवाच्या दिवशी दुसऱ्यांना रिमाइंड नोटीस काढलं आणि तुम्ही ते अतिक्रमण कसल्याही परिस्थितीमध्ये काढून घ्या. त्यानुसार ते अतिक्रमन काढलेलं आहे. त्यामध्ये कुठलंही, कसलंही चुकीचं काम केलेलं नाही, असं मतही पडळकर यांनी व्यक्त केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT