राठोडांवर FIR दाखल झालाचं पाहिजे, देवेंद्र फडणवीसांची मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

पूजा चव्हाण राजीनामा प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेरीस आपली राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. रविवारी दुपारी संजय राठोड यांनी सपत्नीक वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या बैठकीत राठोड यांनी आपलं मंत्रीपद वाचवण्याचे प्रयत्न केले, परंतू समाजमाध्यमांमधून वाढणाऱ्या दबावामुळे मुख्यमंत्री ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम होते. यानंतर राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केल्याचं कळतंय.

दरम्यान याप्रकरणी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरलं आहे. “राठोडांचा राजीनामा हा पहिल्याच दिवशी घ्यायला हवा होता. बूँद से गई वो हौद से नही आती…पुरावे असूनही सरकारने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.” राठोडांचा राजीनामा घेऊन भागणार नाही याप्रकरणात FIR दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

पुजा चव्हाण प्रकरणात पोलीसांनी योग्य तपास केला नाही. विरोधीपक्षाकडून चित्रा वाघ, समाजमाध्यमं, प्रसारमाध्यमांमधून दबाव वाढायला सुरुवात झाल्यानंतर अखेरीस सरकारला राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला. दरम्यान उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्यासाठी काय रणनिती आखतायत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT