मुंबई : ताडदेव परिसरात इमारतीला लागलेल्या आगीत मृतांचा आकडा सात वर
मुंबईकरांसाठी या आठवड्याचा शेवट फारसा चांगला झालेला नाहीये. ताडदेव परिसरातील कमला इमारतीमध्ये २० व्या मजल्याला लागलेल्या आगीत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सात जणांचा मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्यानंतर १५ जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी नाय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ७ रुग्णांपैकी ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून दोघांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. […]
ADVERTISEMENT

मुंबईकरांसाठी या आठवड्याचा शेवट फारसा चांगला झालेला नाहीये. ताडदेव परिसरातील कमला इमारतीमध्ये २० व्या मजल्याला लागलेल्या आगीत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सात जणांचा मृत्यू झाला आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्यानंतर १५ जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यापैकी नाय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ७ रुग्णांपैकी ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून दोघांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. याव्यतिरीक्त कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या २ रुग्णांपैकी एकाचा तर भाटीया रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
भाटीया रुग्णालयाजवळ असलेल्या या इमारतीत सकाळी ८ वाजून १० मिनीटांच्या सुमारास आग लागल्याची माहिती समोर आली. ही माहिती कळताच अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग कशामुळे लागली याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
अग्नीशमन दलाने घटनास्थळी पोहचताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं. परंतू आग विझल्यानंतरही धूर येत असल्यामुळे या इमारतीतील सहा वृद्धांची प्रकृती खालावली. त्यांना ऑक्सिजनची गरज भासल्यामुळे तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला.