नागपूर : कामठी औद्योगिक भागातील तीन कंपनी आणि गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूरच्या कामठी रोड परिसरातील उप्पलवाडी औद्योगिक परिसरातील टायरच्या कंपनीला आग लागली आहे. या आगीची भीषणता नंतर इतकी वाढली की शेजारीच असलेल्या प्लास्टिक कंपनी आणि गोडाऊनही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे. घटनेची माहिती मिळताच नागपूर अग्नीशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी साडेसहा वाजल्याच्या दरम्यान ही आग लागल्याचं कळतंय. या वेळेत कंपनी आणि गोडाऊनमध्ये कोणताही मजूर नसल्यामुळे जिवीतहानी टळली आहे. परंतू या आगीत टायर आणि प्लास्टिकचं सामान पूर्णपणे जळून खाक झालं आहे.

अग्नीशमन दलाचे अधिकारी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू प्लास्टिकच्या सामानामुळे ही आग आणखीन धुमसते आहे. या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT