अकोल्यात जपान जीन भागातल्या प्लास्टिक खेळणे आणि सायकलच्या गोदामाला भीषण आग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धनंजय साबळे, प्रतिनिधी, अमरावती

अकोल्यातल्या जपान जीन भागात प्लास्टिक खेळणी आणि सायकल गोदामाला भीषण आग लागली आहे. सकाळी सात वाजता ही आग लागली. अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची शर्थ करत आहेत. ही आग इतकी भयंकर होती की आगीचे लोट आणि आगीचा धूर 3.4 किमी पर्यंत दिसत होता. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामन दलाच्या जवानांना अरुण रस्त्याचा आणि गोदाम पूर्ण बंद असल्यामुळे खिडक्यातून आणि एका भागातून पाणी मारता येत होतं. त्यामुळे आगीचे भडके हे आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न चालू असताना सुद्धा भडकत होती. शेजारी कुलरच्या तात्यांचे गवताचे गोडाऊन होते पण वेळीच अग्निशामन दलाने त्यांना ते रिकामं करण्यास सांगितलं आणि या आगीवर जवळपास 15 ते 16 अग्निशमन दलाचे बंब वापरून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीमध्ये जवळपास दहा ते बारा लाख रुपयाचे खेळणे आणि प्लास्टिकची सायकल साहित्य जळून खाक झालं आहे.

ADVERTISEMENT

अग्निशमन दलाने आगीचं रौद्ररूप पाहता लोकवस्ती आणि बाकीच्या गोडाऊन अलर्ट केलं होतं. आग अग्निशमन दलाच्या मोठ्या प्रयत्नानंतर चार तासानंतर आटोक्यात आली यामध्ये आगीमध्ये अग्निशमन दलाचा जवान गोपाल इंगळे याच्या हातात त्याच्या हाताला प्लास्टिकच्या पडते थेंब पडल्यामुळे तो जखमी झाला. आग नियंत्रणाच्या प्रयत्न अग्निशामक दलाला सोबत स्थानिक नागरिक आणि पोलिसांची मोठी मदत झाली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT