Mumbai Fire : जीव वाचवण्याच्या धडपडीत हात सुटला अन्…; मुंबईतील आगीची भयंकर दृश्ये
कुर्ला परिसरात झालेल्या अग्नितांडवाची घटना ताजी असतानाच आज मुंबईतील ६० मजली इमारतीच्या १९व्या मजल्या भयंकर आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा जीव वाचवताना मृत्यू झाला असून, हा काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबईतील करी रोड परिसरातील असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न पार्क या इमारतीला शुक्रवारी अचानक आग लागल्याची घटना समोर आली. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
कुर्ला परिसरात झालेल्या अग्नितांडवाची घटना ताजी असतानाच आज मुंबईतील ६० मजली इमारतीच्या १९व्या मजल्या भयंकर आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा जीव वाचवताना मृत्यू झाला असून, हा काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हे वाचलं का?
मुंबईतील करी रोड परिसरातील असलेल्या माधव पालव मार्गावरील अविघ्न पार्क या इमारतीला शुक्रवारी अचानक आग लागल्याची घटना समोर आली.
ADVERTISEMENT
सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांनी आग लागल्याचा प्रकार समोर आला. इमारतीतील १९ व्या मजल्यावर आगीने तांडव घातलं.
ADVERTISEMENT
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
१९ व्या मजल्यावरुन धुराचे प्रचंड मोठे लोळ बाहेर पडत आहेत. आग लागण्याचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
या इमारतीला आग लागल्यानंतर एक व्यक्ती हा बाल्कनीबाहेर येऊन स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्न करत होता.
गच्चीवरील कठड्याचा पाईप घट्ट पकडण्याच्या प्रयत्नात मूठ सुटली आणि तो १९ व्या मजल्यावरुन खाली कोसळला. जीव वाचवण्याच्या धडपडीत त्याला प्राण गमवावा लागला. मयत व्यक्तीचं नाव अरुण तिवारी असं आहे.
१९ व्या मजल्यावरुन खाली पडणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अग्नीशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
मुंबईतील करी रोड परिसरातील माधव पालव मार्गावर असलेल्या अविघ्न पार्क या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी घटनास्थळी धाव घेतली. आयुक्तांशी चर्चा करताना किशोरी पेडणेकर.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT