Gujarat Election 2022: भाजपसाठी गुजरातचा गड प्रचंड अवघड.. ‘आप’ मारणार बाजी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गुजरात विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होणार आहे, त्यानंतर 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे. गुजरातमध्ये तब्बल 27 वर्षांपासून सातत्याने विजय मिळवणारा भाजप आपली सत्ता वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. तर काँग्रेस आपला गुजरातमधील वनवास संपवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचवेळी निवडणूक लढत तिरंगी होण्यासाठी प्रयत्नशील असलेला आम आदमी पक्ष पूर्ण जोमाने रिंगणात उतरला आहे. अशावेळी सर्वच पक्ष विजयाची हमी देत आहेत, तसेच प्रचंड बहुमत मिळण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे, पण प्रत्यक्षात सगळेच पक्ष किती पाण्यात आहेत याचाच आपण उहापोह करणार आहोत.

ADVERTISEMENT

निवडणुकीच्या रणधुमाळीत काय होऊ शकतं?

गुजरात निवडणुकीतील राजकीय पक्षांच्या विजयाच्या दावे हे आपण SWOT ANALYSIS. Strength, Weakness, Opportunity, Threat हे मॉडेल सोप्या शब्दात स्पष्ट करू शकते की कोणता पक्ष निवडणुकीत नेमका कुठे आहे, त्याची ताकद काय आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत नेमकं कोण भारी पडू शकतं. या निवडणुकीत सर्वांचं लक्ष हे भाजपच्या कामगिरीवर असणार आहे. एकीकडे पक्षाला 27 वर्षांच्या अँटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागणार आहे तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचेही तगडं आव्हान आहे. अशा भाजपसाठी गुजरातमध्ये नेमकी काय परिस्थिती असणार आहे हे आपण जाणून घेऊया सविस्तर.

ताकद (Strength): पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात निवडणुकीत भाजपची सर्वात मोठी ताकद आहेत. ज्या चेहऱ्याच्या जोरावर निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे बदलले जाऊ शकते, ज्यांच्या जोरावर भाजप पुन्हा एकदा अनपेक्षितपणे विजय मिळवू शकतं. गुजरात हे नरेंद्र मोदींचे गृहराज्य असल्यामुळे येथील त्यांची लोकप्रियता वेगळ्याच पातळीवर आहे. कोणताही उमेदवार समोर असला तरी पीएम मोदींच्या नावावर भाजपला मते पडतात हे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आहे.

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपसाठी प्लस पॉईंट

पीएम मोदी हा भाजपसाठी प्लस पॉइंट आहे, त्याशिवाय देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील गुजरातचेच असल्याने भाजपसाठी परिस्थिती आणखी मजबूत झाली आहे. भाजपचे ‘चाणक्य’ मानले जाणारे अमित शहा यांना गुजरातच्या राजकारणाची पक्की जाण आहे, त्यांना इथले समीकरणही कळते आणि मतदारांची नाडीही समजते. आपल्या विरोधकांना निवडणुकीच्या चक्रात कसे अडकवायचे हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे.

ज्या पक्षाचे स्थानिक पातळीवर संघटन मजबूत आहे, त्या पक्षाची निवडणूक जिंकण्याची अधिक शक्यता असते, असे नेहमी म्हटले जाते. सध्याही गुजरातमध्ये भाजपची स्थिती मजबूत दिसतेय. गेल्या अनेक वर्षांत भाजपने बूथ लेव्हलपर्यंत एक संघटना निर्माण केली आहे की, निवडणुकीच्या वेळी सक्रिय योग्य पद्धतीने सक्रीय होते आणि ज्याचा थेट फायदा हा पक्षाला होतो.

ADVERTISEMENT

भाजपकडून पाटीदार समाजाला जवळ करण्याच्या प्रयत्नात

भाजप यावेळी पाटीदार समाजाला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल आणि पाटीदार आरक्षण आंदोलनाने भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले होते. त्यावेळी भाजपच्या जागा 99 वरच अडकल्या होत्या. मात्र, आता हार्दिकने भाजपमध्ये प्रवेश केला असून भूपेंद्र पटेल यांच्या रूपाने पाटीदार समाजाचा मुख्यमंत्री गुजरातमध्ये आहे. अशा परिस्थितीत ही पारंपरिक व्होट बँक कायम आपल्यासोबतच राहिल यासाठी भाजपचे कशोसीने प्रयत्न सुरु आहे. या मुद्द्यांशिवाय भाजपने निवडणूक प्रचारात पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला आहे. पंतप्रधान मोदींनीही दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ज्यामुळे भाजपची राजकीय स्थिती मजबूत होऊ शकते.

ADVERTISEMENT

कमकुवतपणा (Weakness): गुजरातमध्ये भाजपची जी सर्वात मोठी ताकद त्याचा कमकुवतपणा देखील ठरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा करिष्मा असलेला नेता भाजपला गुजरातमध्ये अद्याप तरी सापडलेला नाही. 2014 पासून गुजरातमध्ये तीन मुख्यमंत्री बदलले आहेत.

काही असेही मुद्दे आहेत ज्यामुळे भाजपची चिंता वाढू शकते. यामध्ये महागाई, बेरोजगारी आणि शालेय शिक्षण हे मुद्दे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. या मुद्द्यांच्या आधारेच आम आदमी पक्ष स्वत:ला नवा पर्याय म्हणून गुजरातमध्ये जनतेसमोर आहे. अशा स्थितीत भाजपसमोर बरंच आव्हान आहे.

संधी (Opportunity): गुजरातची ही निवडणूक भाजपसाठीही संधी घेऊन येत आहे. सलग सात विधानसभा निवडणुका जिंकण्याचा विक्रम रचण्याची सर्वात मोठी संधीही भाजपकडे आहे. त्या बाबतीत, भाजप सीपीआय-एमच्या विक्रमाशी बरोबरी करू शकणार आहे, जिथे डाव्यांनी बंगालमध्ये 34 वर्षे अखंडपणे राज्य केले. यावेळी निवडणुकीत काँग्रेसशिवाय आम आदमी पार्टी आणि एआयएमआयएम सारखे 39 पक्ष निवडणूक लढवत आहेत. अशा स्थितीत मतांची विभागणी ही भाजपसाठी बरीच फायदेशीर ठरू शकते.

धोका (Threat): गुजरात निवडणुकीत भाजपसाठी सर्वात मोठा धोका हा बंडखोर उमेदवारांपासून असणार आहे. ज्यांना पक्षाने तिकीट नाकारलं आहे. सुमारे डझनभर बंडखोर नेते हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. अशा स्थितीत त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरणं हे भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. भाजपने काँग्रेसमधून पक्षांतर करणाऱ्या अनेकांना तिकीट दिल्यानेही भाजपच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आता या नाराजीचा निवडणूक निकालांवर परिणाम होऊ नये, ही भाजपसाठी मोठी चिंतेची बाब आहे.

भाजपच्या विरोधात गुजरातमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही असं पक्षाला वाटतं. पण गुजरातमध्ये 27 वर्षांपासून सत्तेत आहे. त्यामुळे नाही म्हटलं तरी भाजपबाबत नाराजी आहे. तरुण मतदारांची एक संपूर्ण पिढी आहे ज्यांनी फक्त भाजपची राजवट पाहिली आहे. असं असलं तरी, गुजरातमध्ये एक ट्रेंड सतत दिसत आहे, प्रत्येक निवडणुकीसोबत गुजरातमध्ये पक्षाच्या जागा या कमी होत आहेत. गतवेळी पक्ष 99 जागांवरच अडकला. त्यामुळे आता निवडणुकीत भाजपच्या जागा वाढणार की कमी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नुकतीच घडलेली मोरबी दुर्घटना आणि ज्यामध्ये 135 जणांना हकनाक जीव गमवावा लागला होती. ही दुर्घटना देखील भाजपसाठी निवडणुकीत चिंतेचे कारण ठरू शकतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT