आमचीच खरी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अन् तेच नाव मिळालं : शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : आमचीच खरी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आहे अन् तेच नाव आम्हाला मिळालं, याचा मनापासून आनंद आहे, अशी पहिली प्रतिक्रिया शिंदे गटाकडून देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी सायंकाळी शिंदे-ठाकरे गटाला नवीन नाव आणि चिन्हांचे वाटप केले. यानुसार ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव मिळालं आहे. तर ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं […]
ADVERTISEMENT
मुंबई : आमचीच खरी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आहे अन् तेच नाव आम्हाला मिळालं, याचा मनापासून आनंद आहे, अशी पहिली प्रतिक्रिया शिंदे गटाकडून देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी सायंकाळी शिंदे-ठाकरे गटाला नवीन नाव आणि चिन्हांचे वाटप केले. यानुसार ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव मिळालं आहे. तर ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह मिळालं आहे. याशिवाय शिंदे गटाला अद्याप चिन्ह मिळालं नसलं तरी बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे.
ADVERTISEMENT
या निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर म्हणाले, गुवाहटीमधून मला शिंदे साहेबांनी सांगितलं होतं आणि मी देखील जाहिरपणे सांगितलं होतं की, आमचीच शिवसेना ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे. तेच नाव आज आम्हाला मिळालं आहे, याचा मनापासून आनंद आहे. यानिमित्ताने आम्हाला बाळासाहेबांचे आशीर्वादही मिळाले आहेत. त्यामुळे आम्ही अतिशय समाधानी आहोत. बाळासाहेबांचे आणि हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे मार्गक्रमण करत राहू, असाही निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Thackeray vs Shinde : शिंदेंना बाळासाहेबांची शिवसेना; ठाकरे गटाला उद्धव ठाकरेंचे नाव!
हे वाचलं का?
नावात आम्ही समाधानी आहोत. बाळासाहेबांची शिवसेना हेच आम्हाला नाव पाहिजे होतं. तेच नाव आम्हाला मिळालं आणि याच नावानं आम्ही पुढे जाऊ. लोकांच्या मनातील नाव आम्हाला मिळालं आहे. त्यामुळे आता कोणतंही चिन्हं मिळालं तरी हरकत नाही, असं शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल लोंढे म्हणाले, हा शिंदे गट नाही तर बाळासाहेबांची शिवसेना आहे. शिंदे साहेब सांगत होते पण त्यांचे विचार कोणाला पटले नाहीत. त्यांना वाटत होतं बाळासाहेब त्यांची खाजगी प्रॉपर्टी आहे. शिंदे साहेबांनी जो उठाव केला तो 20 जूनला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी होता.
ADVERTISEMENT
बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार पुसण्याचा प्रयत्न त्यांच्याच पुत्राने केला. स्वतःचा पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दावनीला बांधण्याचा प्रयत्न नाही तर दवणीलाचं बांधला. 40 आमदार, 12 खासदार, नगरसेवक. जिल्हाप्रमुख हे शिंदे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. कारण बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, असेही लोंढे यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT