Uddhav Thackeray :…”तर लोकशाही देशातून संपली हे जाहीर करा आणि खोके…”
इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद लोकशाहीची व्याख्या नेमकी आहे तरी काय? खोक्यांचं राजकारण करायचं असेल तर लोकशाही संपली असं जाहीर करून टाका असं शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद या ठिकाणी उद्धव ठाकरे मराठवाडा साहित्य संमेलनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे. काय म्हटलं आहे उद्धव […]
ADVERTISEMENT
इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद
लोकशाहीची व्याख्या नेमकी आहे तरी काय? खोक्यांचं राजकारण करायचं असेल तर लोकशाही संपली असं जाहीर करून टाका असं शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद या ठिकाणी उद्धव ठाकरे मराठवाडा साहित्य संमेलनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी?
लोकशाहीमध्ये तुम्ही जर आम्हाला मतं देऊन निवडून देत असाल तर तुमच्या मतांची किंमत ही खोक्यांमध्ये नाही तर त्या भावनेत असली पाहिजे. आता पंचाईत अशी झाली आहे की आपल्याकडे गुप्त मतदान आहे. म्हणजे काय झालंय की मी दिलेलं मत माझ्याशिवाय इतर कुणाला कळता कामा नये हा गुप्त मतदानाचा अर्थ आहे. आता तुम्ही दिलेलं मत तुम्हाला तरी कळतंय का कुठे जाणार आहे?
तुमचं मत जर…
ट्रॅव्हल एजन्सीसारखं तुमचं मत सुरतला, मग गुवाहाटीला, मग गोव्याला असं जाणार असेल तर काय अर्थ आहे त्या मताला? ही लोकशाही आपण मानू शकत नाही. लोकशाहीचा अर्थ असा लागणार असेल तर हिंमत असेल तर जाहीर करा की लोकाशाही संपली. तुम्ही मत कुणालाही दिलं तरी आम्हाला पाहिजे तेच होणार आम्ही त्याच्या घरी खोके पाठवू आणि त्याला बसवून आमच्याकडे आणू तुम्ही बसा बोंबलत असं धोरण आहे. राजकारण हे काही वाईट नाही. मात्र अशा राजकारणाला काय अर्थ आहे असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
हे वाचलं का?
आम्हाला का सत्ता हवी आहे?
आम्हाला निवडणूक का लढायची? का सत्ता पाहिजे? तर देशाचं भलं करायचं, राज्याचं भलं करायचं म्हणून आम्ही मतं मागत असतो. नुसतं सगळं बुडाखाली ठेवायचं असेल तर आम्हाला सत्ता हवी असेल तर शिवसेनाप्रमुख म्हणायचे तसंच असलं पाहिजे की लोकांना जसा लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आहे तसा परत बोलवण्याचाही हवा असंही रोखठोक मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.
साधा मुलभूत प्रश्न असा आहे की लोकशाही आपल्या देशात रुजली आहे का? स्वातंत्र्याच्या आधीपासून साहित्य संमेलनं होत आहेत. त्यावेळी वीर सावरकर म्हणाले होते की साहित्यिकांनो लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या. मला आज बोलावलं आहे मी काय सांगू? अणू बॉम्ब हाती घ्या? तसं अजिबात नाही. पण शब्दाचं सामर्थ्य फार मोठं आहे. लोकशाही आपल्या देशात रुजली नाही असं मला वाटतं की न्याय व्यवस्थाही सरकार आपल्या मनाप्रमाणे चालवू पाहते आहे असं धोरण तुम्हाला मान्य आहे का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT