Salim Durani : टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटर सलीम दुर्रानी यांचे निधन
Salim Durani Passed Away :टीम इंड़ियाचे दिग्गज क्रिकेटर सलीम दुर्रानी यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाल्याची घटना समोर आली आहे. दुर्रानी यांच्या निधनानंतर त्यांनी क्रिकेटसह सर्व क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
Salim Durani Passed Away : टीम इंड़ियाचे दिग्गज क्रिकेटर सलीम दुर्रानी (Salim Durani) यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून ते कॅन्सरच्या आजाराचा सामना करत होते. गुजरातच्या जामनगरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे. दुर्रानी यांच्या निधनानंतर त्यांनी क्रिकेटसह सर्व क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. (former cricketer salim durani passed away indian cricketer death due to cancer)
ADVERTISEMENT
कोण आहेत सलीम दुर्रानी?
सलीम दुर्रानी (Salim Durani passed Away) यांचा जन्म 11 डिसेंबर 1934 ला अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये झाला होता. पण ज्यावेळेस सलीम दुर्रानी हे 8 वर्षाचे होते, तेव्हा त्यांचे कुटूंब पाकिस्तानात स्थायिक झालं होतं.यानंतर जेव्हा भारत-पाकिस्तानात फाळणी झाली त्यावेळी ते भारतात आले होते.
क्रिकेट करिअर
क्रिकेटच्या 60-70 च्या दशकात सलीम दुर्रानी (Salim Durani)यांनी ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळख बनवली होती. भारताच्या क्रिकेटच्या इतिहासात सलीम दुर्रानी एक उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखले जातात. दुर्रानी यांनी 1960 साली ऑस्ट्रेलिया विरूद्ध मुंबईत टेस्टमध्ये डेब्यू केला होता. तसेच ते त्यांच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. क्रिकेट फॅन्सच्या सांगण्यावरून सिक्स ठोकण्यासाठी ते खुप प्रसिद्ध होते.
हे वाचलं का?
अर्जुन अवॉर्डचा किताब जिंकला
सलीम दुर्रानी (Salim Durani) हे भारताचे पहिले असे क्रिकेटर आहेत, ज्यांना अर्जुन अवॉर्ड मिळाला आहे. 1960 साली सलीम दुर्रानी अर्जुन अवॉर्डचा किताब देण्यात आला होता. सलीम दुर्रानी यांनी 29 टेस्ट सामने खेळले आहे. या सामन्यात त्यांनी 1202 रन केले होते. यामध्ये त्यांनी 1 शतक आणि 7 अर्धशतक लगावले आहे. यासह त्यांनी गोलंदाजीत 75 विकेट घेतले होते.
सलीम दुर्रानी (Salim Durani) यांनी शेवटचा टेस्ट सामना फेब्रुवारी 1973 मध्ये इंग्लंडविरूद्ध खेळला होता. या सामन्यानंतर त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत नवीन इनिंग सुरु केली. सलीम दुर्रानी यांनी बॉलिवूडच्या चरित्र सिनेमात काम केले. या सिनेमान दिग्गज अभिनेत्री परवीन बॉबी हिरोईन होती.
ADVERTISEMENT
दरम्यान दिग्गज क्रिकेटर सलीम दुर्रानी (Salim Durani) यांच्या निधनानंतर क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे. तसेच सलीम दुर्रानी यांच्या निधनानंतर क्रिकेटसह इतर क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT