महाराष्ट्रातून केंद्रात परतलेले IPS सुबोध जायसवाल असणार CBI चे नवे बॉस!
नवी दिल्ली: केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयच्या (CBI) संचालकपदी IPS अधिकारी सुबोध जायसवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती मंगळवारी (25 मे) रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती ही दोन वर्षांसाठी असेल. सुबोध जायसवाल यांच्याकडे पोलीस खात्यात वरिष्ठ पदावर […]
ADVERTISEMENT
नवी दिल्ली: केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयच्या (CBI) संचालकपदी IPS अधिकारी सुबोध जायसवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती मंगळवारी (25 मे) रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती ही दोन वर्षांसाठी असेल.
ADVERTISEMENT
सुबोध जायसवाल यांच्याकडे पोलीस खात्यात वरिष्ठ पदावर काम करण्याचा दांडागा अनुभव आहे. त्यांनी याआधी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकही म्हणूनही काम पाहिलं होतं. तसंच ते एटीएसचे प्रमुखही होते. तर त्यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदाचा कार्यभारही सांभाळला होता. सुबोध जायसवाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
सीबीआय संचालक निवडीसाठी पंतप्रधान मोदी, सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी अशी उच्चस्तरीय बैठक पार पडली. याच बैठकीत सीबीआयचे नवे प्रमुख म्हणून सुबोध जायसवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.
हे वाचलं का?
ठाकरे सरकार अडचणीत, आणखी एक IPS अधिकारी हायकोर्टात जाणार!
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1984 ते 87 च्या बॅचमधील 109 अधिकाऱ्यांच्या नावापैकी कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (DoPT) ने 10 अधिकाऱ्यांची नावांची यादी तयार केली होती. नंतर या यादीमधील केवळ 6 नावे पुढे करण्यात आली. सीबीआयचे संचालक म्हणून बीएसएफ प्रमुख राकेश अस्थाना आणि एनआयएचे प्रमुख व्हीके एस कौमुदी यांच्या देखील नावाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर या सगळ्यांवर मात करत सुबोध जायसवाल यांनी अखेरच्या क्षणी बाजी मारली.
ADVERTISEMENT
सीबीआयचे नवीन संचालक निवडण्यासाठी जवळजवळ 90 मिनिटांपर्यंत बैठक पार पडली. सुबोध जयस्वाल, केआर चंद्र आणि व्हीके एस कौमुदी यांच्या नावावर बरीच चर्चा झाली. अखेर या बैठकीनंतर सीबीआयचे नवे प्रमुख म्हणून सुबोध जयस्वाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. याआधी ते सीआयएसएफचे महासंचालक होते.
ADVERTISEMENT
देवेन भारतींच्या कामकाजावरही आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी उपस्थित केले प्रश्न
सुबोध जयस्वाल यांनी याआधी जवळजवळ एक दशकाहून अधिक इंटेलिजन्स ब्युरो, एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) आणि R&AW(रिसर्च अँड अॅनालिसिस विंग) बरोबर काम केलं आहे. तेलगी घोटाळ्याच्या चौकशीनंतर सुबोध जायसवाल हे सर्वाधिर चर्चेत आले हबोते. त्यावेळी ते राज्य राखीव पोलीस दलाचे प्रमुख होते.
सीबीआयचे नवे संचालक सुबोधकुमार हे महाराष्ट्राचे एटीएस प्रमुख देखील होते. त्यांच्या नेतृत्वात त्यांनी अनेक दहशतवादविरोधी मोहिमा राबवल्या होत्या. एक स्वच्छ प्रतिमा असलेला IPS अधिकारी अशी सुबोध जायसवाल यांची ओळख आहे. दरम्यान, 2009 साली त्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT