अनिल देशमुखांच्या अडचणी संपता संपेना, आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपां प्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी संपता संपत नाहीत. कारण अनिल देशमुख यांना आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच सचिन वाझेलाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली गेली होती. त्यानंतर त्यांची कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ईडीने दिले होते. आता पुन्हा एकदा त्यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे.

काय आहे प्रकरण?

हे वाचलं का?

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी 100 कोटींची खंडणी दर महिन्याला मुंबईतील बार आणि रेस्तराँमधून गोळा करण्यास सांगितलं होतं असा आरोप केला आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. दरम्यान परमबीर सिंग यांनी एक प्रतिज्ञापत्र काही दिवसांपूर्वी न्यायालयात सादर केलं. त्यामध्ये त्यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात आपल्याकडे पुरावे नसल्याचं म्हटलं आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार, बडतर्फ करण्यात आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून 4 कोटी 70 लाख उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या तपासात असे समोर आले आहे की हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अनिल देशमुख हेदेखील तपास यंत्रणांच्या समोर आलेले नव्हते. मात्र 1 नोव्हेंबरला ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यांची सहा तास चौकशी झाल्यानंतर त्यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT