परमबीर सिंग तुम्ही आहात कुठे भारतात की परदेशात? सुप्रीम कोर्टाने विचारला प्रश्न
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आता सुप्रीम कोर्टाकडे अटकेपासून संरक्षण मागितलं आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने विचारले आहे की परबमीर सिंग कुठे आहेत? तुम्ही कुठे आहात ते समजेपर्यंत अटकेपासून संरक्षण वगैरे काहीही मिळणार नाही असं सुप्रीम कोर्टाने ठणकावून सांगितलं आहे. परमबीर तपासात सहभागी झालेले नाहीत. वरिष्ठ अधिकारी […]
ADVERTISEMENT

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आता सुप्रीम कोर्टाकडे अटकेपासून संरक्षण मागितलं आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने विचारले आहे की परबमीर सिंग कुठे आहेत? तुम्ही कुठे आहात ते समजेपर्यंत अटकेपासून संरक्षण वगैरे काहीही मिळणार नाही असं सुप्रीम कोर्टाने ठणकावून सांगितलं आहे.
परमबीर तपासात सहभागी झालेले नाहीत. वरिष्ठ अधिकारी असूनही ते तपासात सहभागी नसल्याने त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परमबीर सिंग कुठे आहेत ते वकील सोमवारपर्यंत सुप्रीम कोर्टाला सांगणार आहेत. जोपर्यंत वकील उत्तर देत नाहीत तोपर्यंत तुमच्या अर्जावर सुनावणी होणार नाही परमबीर सिंग हे भारतात आहेत की परदेशात? असाही प्रश्न कोर्टाने विचारला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित
काय घडलं सुप्रीम कोर्टात?