धक्कादायक! माजी कुलसचिव वडील आणि डॉक्टर मुलाचा नाशिकमध्ये खून, मृतदेह फेकले दरीत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक

ADVERTISEMENT

संपत्ती आणि मालमत्ता हडपण्याच्या हव्यासापोटी एकाने नाशिकच्या पंडित कॉलनी परिसरात ठराविक दिवसांच्या अंतराने बाप आणि लेकाचा खून केला. या धक्कादायक घटनेचा उलगडा करण्यात सरकारवाडा पोलिसांना यश आले. नानासाहेब रावजी कापडणीस आणि अमित नानासाहेब कापडणीस अशी खून झालेल्या बापलेकाची नावे आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त अमोल तांबे,सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना यांनी पत्रकार परिषद घेत दिलेल्या माहिती नुसार ,मृत नानासाहेब यांची मुंबईत असलेली आणि मुलगी फिर्यादी शीतल नानासाहेब कापडणीस यांनी त्यांचे वडील नानासाहेब रावजी कापडणीस आणि त्यांचा भाऊ अमित नानासाहेब कापडणीस हे हरवल्याची तक्रार २८ जानेवारी २०२२ रोजी सरकारवाडा पोलीस ठाण्यात केली होती.

हे वाचलं का?

नाशिक : ‘वेळ लागेल म्हणाली अन् मोबाईल स्विच ऑफ झाला’; वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मृत्यूने शहर हादरलं

नाशिकमध्ये एका हायप्रोफाईल कुटुंबातील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात सरकारवाडा पोलिसांना यश आलं आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल असा हा सर्व घटनाक्रम आहे. विशेष म्हणजे, आरोपीनं देखील एमबीए फायनान्सचं शिक्षण घेतलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि एमबीबीएसचे शिक्षण घेतलेला त्यांचा मुलगा अमित कापडणीस हे गंगापूर रोडवरील जुनी पंडीत कॉलनीत आनंद गोपाळ पार्क अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होते. कापडणीस यांच्याकडे असलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीवर त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आणि शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्या राहुल जगतापची नजर पडली. अन् त्यानं एक कट रचला.

ADVERTISEMENT

नाशिक : डॉ. सुवर्णा वाजे जळीतकांडाची उकल, पतीकडूनच हत्या झाल्याची पोलिसांची माहिती

ADVERTISEMENT

नानासाहेब कापडणीस यांचा मुलगा अमित कापडणीस यांच्याशी जवळीक साधत राहुलनं त्याला दारूचं व्यसन लावलं आणि त्यांच्याकडून नानासाहेब यांची सर्व वैयक्तिक माहिती गोळा केली. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे, आठ ते दहा दिवसांच्या अंतरावरच कापडणीस बाप लेकाचा हातानं गळा दाबून त्यानं निर्घृण खून केला. त्यानंतर दोन्ही मृतदेहांच्या अंगावर दारू टाकून जाळून दिलं आणि त्यांची ओळख पटू नये या उद्देशानं नानासाहेब यांचा पालघर जिल्ह्यात तर अमितचा नगर जिल्ह्यात मृतदेह फेकून दिला.

याप्रकरणी अज्ञाताविरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात आणि राजूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे कृत्य केल्यानंतर राहुल जगतापनं नानासाहेब कापडणीस यांचं व्यवहार हाताळत मालमत्ता हडप करण्याचा पराक्रम सुरू केला होता. तसेच कापडणीस यांच्या नावावरील घरावरही त्याचा डोळा होता. शेअर मार्केटमधील गुंतवणूक तसेच बँकेतील पैसे काढण्याचं काम त्यानं सुरू केलं होतं. शेअर मार्केटमधील 97 लाख रुपये आपल्या नावावर करत त्यातून रेंज रोव्हर ही आलिशान कार खरेदी केली होती.

नाशिक : स्वस्तात सोनं देण्याचं अमिष दाखवून व्यापाऱ्याला ७५ लाखांचा गंडा

मृत अमितची आई आणि बहीण हे अमेरिकेत राहत असल्याचा राहुल जगतापला समज होता. मात्र मुंबईतच राहत असलेल्या अमितच्या बहीणीनं वडिल आणि भावाशी संपर्क न झाल्यानं सरकारवाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत मयतांच्या डिमॅट अकाउंटवरून झालेल्या व्यवहारांचे आधारे राहुल जगतापला बुधवारी बेड्या ठोकल्या. डिसेंबर महिन्यात झालेला खून, जानेवारीत हरवल्याची तक्रार, फेब्रुवारीत गुन्ह्याची झालेली उकल आणि त्यातून निष्पन्न झालेला, हा सर्व प्रकार यामुळे पोलिसांना देखील धक्काच बसला आहे. सध्या राहुल जगतापला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्याचे अजून कोणी साथीदार आहेत का? अशाप्रकारे अजून काही संपत्ती त्यानं गोळा केली आहे का? यापूर्वी त्यानं असे काही प्रकार केले आहेत का? हा सर्व तपास पोलीस सध्या करत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT