कराडच्या वस्तीत चार सिलिंडरचा स्फोट आणि भीषण आग, 24 घरं जळून खाक

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

इम्तियाज मुजावर, प्रतिनिधी, सातारा

ADVERTISEMENT

कराड बसस्थानकापासून जवळच असलेल्या परिसरातील वस्तीला मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. रौद्ररूप धारण केलेल्या या आगीत चार सिलिंडरचा स्फोट झाल्याने संपुर्ण परिसर हादरून गेला. वस्तीतील महिलांसह कराड न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जिवितहानी झाली नाही. परंतु, या भयावह आगीत 24 घरे जळून खाक झाली आहेत. तर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथे बसस्थानकापासून जवळच असलेल्या वस्तीत मध्यरात्री अचानक आग लागली.

हे वाचलं का?

एका घराला लागलेली आग वेगाने वाढत गेली. आग लागल्याने महिलांसह नागरिक आरडाओरडा करत रस्त्यावर आले. त्या महिलांसह आसपासच्या नागरिकांनी आग लागलेल्या घरांशेजारील इतर घरात झोपलेल्या कुटुंबांना जागे करत बाहेर आणले. तोपर्यंत आग प्रचंड वाढत गेली. आगीच्या भडक्यात चार घरातील सिलिंडर्सचा स्फोट झाल्याने हा परिसर हादरून गेला. सिलिंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने शहरात खळबळ उडाली.

ADVERTISEMENT

आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांसह पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत आगीत २४ घरातील साहित्य जळून खाक झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीमुऴे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. त्यांची तात्पुरती राहण्याची सोय नगरपरिषद शाळा क्रमांक तीन येथे केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT