‘त्या’ बैठकीला गैरहजर राहून उद्धव ठाकरेंकडून महाराष्ट्राचा अपमान’, भाजपने साधला निशाणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Uddhav Thackeray: नवी दिल्ली: ‘जगातील प्रगत राष्ट्रांच्या जी 20 परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले असून त्या निमित्ताने राज्याचा विकास आणि आपली संस्कृती जगासमोर मांडण्याची संधी आहे. या संदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीला केंद्र सरकारने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण देऊनही ते बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. महाराष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःच्या राजकारणाला महत्त्व देऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा अपमान केला आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे.’ अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. (g20 conference uddhav thackeray insulted maharashtra by not attending all party meeting chandrasekhar bawankule criticizes)

ADVERTISEMENT

चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या उच्चस्तरीय संघटनात्मक बैठकीसाठी नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या चार ठिकाणी जी 20 परिषदेच्या 14 बैठका होणार आहेत. यानिमित्ताने राज्यातील विकासाचे प्रकल्प आणि आपली संस्कृती जगासमोर मांडण्याची संधी आहे. जी 20 परिषदेच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे सोमवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. त्याला भाजपाखेरीज इतर अनेक प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. परंतु निमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाही.’

हे वाचलं का?

मोदी-शहांच्या राज्यात ते शक्य आहे काय? ठाकरेंचा सवाल, कायदामंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी

‘तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण होते. त्यांना काही कारणाने उपस्थित राहता आले नसेल तर पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित रहायला हवे होते. पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या या दोन्ही नेत्यांनी बैठकीस गैरहजर राहून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे.’ अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

ते पुढे असेही म्हणाले की, ‘महाराष्ट्राला या परिषदेतून खूप काही मिळणार आहे. अशा वेळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार का उपस्थित राहिले नाहीत, हे त्यांनी सांगितले पाहिजे. या बैठकीच्या ऐवजी उद्धव ठाकरे दिवसभर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आणि महाविकास आघाडीची बैठक यात गुंतून राहणं पसंत केलं. या बैठका नंतरही झाल्या असत्या. महाराष्ट्राच्या हिताच्या महत्त्वाच्या बैठकीस गैरहजर राहणे हा राज्याचा अपमान आहे. हे निषेधार्ह आहे.’ असं म्हणत बावनकुळेंनी ठाकरे-पवारांना टार्गेट केलं.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही ठाकरे-पवारांवर टीका

ठाकरे-पवार यांच्या गैरहजेरीवर मुख्यमंत्री शिंदेंनी देखील काल जोरदार टीका केली होती. शिंदे म्हणाले की, ‘निमंत्रण सगळ्यांनाच गेले होते. परंतु एवढी महत्त्वाची बैठक, राज्याचं हित, देशाचं हित देश प्रेम या सगळ्या गोष्टी सोडून, या बैठकीमध्ये अनुपस्थित राहून काय त्यांना दाखवायचं होतं? काय दर्शवायचं होतं? हेच देशप्रेम आहे का? हेच राज्याचं प्रेम आहे का? त्याचं वेगळं प्रेम आजच्या या कृतीतून दिसून आलेलं आहे.’ अशा बोचऱ्या शब्दात शिंदेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.

‘खोके पोहचले का?’, मोदी-शिंदे सरकारची ‘सामना’त जाहिरात, उद्धव ठाकरेंना सवाल

नवी दिल्लीत आयोजित जी 20 संबंधी बैठकीसाठी विविध पक्षांना निमंत्रण होते. बैठकीस भाजपचे विरोधक असलेले काँग्रेस, ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, आप अशा पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार गैरहजर होते. ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT