ganesh chaturthi wishes in marathi : गणेशोत्सवात प्रियजनांना Whartsapp, Facebook वरून अशा द्या शुभेच्छा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती, बुद्धीचा देवता असलेल्या सर्वांच्या लाडक्या बापाचं म्हणजे विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाने सगळीकडून जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण आहे. सगळीकडे बाप्पाच्या सेवेची लगबग सुरू असून, प्रियजनांना आणि आप्तस्वकीयांना संदेशातूनही गणेशोत्सावाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे.

ADVERTISEMENT

तुम्हीही व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियातून आप्तेष्टांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना, प्रियजणांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता. गणरायाच्या आगमनानंतर मराठी भाषेतून शुभेच्छा संदेश देऊन गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा…

हे वाचलं का?

हरिसी विघ्न जनांचे,

असा तू गणांचा राजा..

ADVERTISEMENT

वससी प्रत्येक ह्रदयी,

ADVERTISEMENT

असा तू मनांचा राजा..

स्वीकारावा गणराया

साष्टांग दंडवत माझा..

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Ganesh Chaturthi 2022 : अशा प्रकारे करा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा, घरी नांदेल सुख, समृद्धी आणि शांतता

गणपती बाप्पा मोरया!!

बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, ही प्रार्थना…

गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा

मोदकांचा प्रसाद केला,

लाल फुलांचा हार सजवला

मखर नटून तयार झाले,

वाजत गाजत बाप्पा आले

गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

बुद्धीची देवता, चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपती, विघ्नहर्ता श्री गणराया, तुमची सर्व विघ्न दूर करो आणि समृद्धी आणो, हीच प्रार्थना!

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Ganesh Chaturthi 2022: लाडक्या बाप्पाचं आगमन, राशीनुसार काय नैवैद्य दाखवायचा? जाणून घ्या

॥गणपती बाप्पा मोरया॥

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:।

निर्विघ्नं कुरु मे देव: सर्वकार्येषु सर्वदा।।

गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा !

भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा

असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा

गणेश चतुर्थीच्या आपणास व आपल्या कुटुंबाला शुभेच्छा

गणपती तुझे नाव चांगले,

आवडी बहू चित्त दंगले,

प्रार्थना तुझी गौरीनंदना,

बुद्धी, ज्ञान दे हे दयाघना!

गणेश चतुर्थीच्या आपणास मंगलमय शुभेच्छा

गणेशोत्सवाच्या आपल्याला व आपल्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा!

हा गणेशोत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुखं आणि समृद्धी घेऊन येवो, हीच विघ्नहर्त्याचरणी प्रार्थना!!

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाच्या कृपेने तुमच्या घरी सुख, समृद्धी आणि यश सदैव नांदो!

गणेशोत्सवाच्या आपल्याला व आपल्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा…!

Ganesh Chaturthi 2022: १० वर्षांनी जुळून आला ‘हा’ योग, अशी करा बाप्पाची पूजा

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।

कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥

चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाने तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी अन् आरोग्य लाभो!

गणपती बाप्पा मोरया!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT