Ganesh Utsav 2021 : नवसाला पावणारा गणपती म्हणून नागपूरच्या टेकडी गणपतीची ख्याती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

ADVERTISEMENT

नागपुरातील प्राचीन टेकडी गणेश मंदिर या ठिकाणी असलेल्या गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. ही मूर्ती भोसले यांच्या काळातील आहे. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये क्रमांक एकचा मान मिळतो तो याच गणपतीला. टेकडी गणपती मंदिर हे भोसलेकालीन मंदिर असून येथील गणेश मूर्ती साडेतीनशे वर्षे जुनी असल्याचा अंदाज आहे.पिंपळाच्या झाडाखाली ही मूर्ती स्वयंभू आहे..

पूर्वीच्या काळी भोसले राजघराण्यातील मंडळी दररोज दर्शनाला या मंदिरात येत असत. सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असून हे जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा गणपती अशी या नागपूरच्या टेकडीच्या गणपतीची ओळख आहे. पिंपळाच्या झाडाखाली साधारण तीनशे ते साडेतीनशे वर्षापूर्वी ही स्वयंभू मूर्ती प्रकट झाली अशी अख्यायिका सांगितली जाते. विदर्भातील अष्टविनायकांपैकी सर्वात मानाचा प्रथम क्रमांकाचा गणपती म्हणून नागपूरच्या टेकडी गणपती चा उल्लेख करण्यात येतो.

हे वाचलं का?

असं म्हणतात की नागपूरचा टेकडी चा गणपती हा नवसाला पावणारा गणपती आहे, त्यामुळेच येथे नागपूरातूनच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात..इतकंच नव्हे तर मोठे मोठे राजकारणी, क्रिकेटपटू सुद्धा टेकडीच्या गणपतीला दर्शनासाठी येत असतात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ज्यावेळी नागपुरात क्रिकेट सामन्यांसाठी येत असे त्यावेळी हमखास तो सामन्यापूर्वी याच टेकडीच्या गणपतीला दर्शनासाठी येत असे.

लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा राजकारणी सुद्धा निवडणुकीपूर्वी या गणपतीला दर्शनासाठी आवर्जून येत असतात. नागपूरच्या सीताबर्डी परिसरात असलेल्या या प्राचीन गणेश मंदिरात जानेवारी महिन्यात तिळी चतुर्थी निमित्त मोठी यात्रा भरते ज्यामध्ये लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात ..

ADVERTISEMENT

अत्यंत प्राचीन अशा या गणपती मंदिरात सध्या जिर्णोद्धाराचं काम सुरु आहे. राजस्थान वरून आलेले कारागीर दिवस-रात्र मंदिर भव्य बनविण्यासाठी कार्य करत आहेत .नागपूरच्या टेकडीचा गणपती हा श्रीमंत गणपती म्हणून सुद्धा ओळखला जातो. सध्या राज्यातील सर्वच मंदिरे बंद असल्याने नागरिकांना मंदिरात प्रवेश नाही. मागील वर्षी आणि यंदा सुद्धा कोरोनाचं सावट असल्यामुळे भाविकांची गर्दी मंदिरामध्ये नसली तरी गणेशोत्सवादरम्यान भाविक मंदिराच्या बाहेरून का होईना आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन करण्यासाठी येथे येत असतात.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT