गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांनी साताऱ्याजवळ अटक; काय आहे प्रकरण?
–इम्तियाज मुजावर, सातारा पुणे व तासगाव (जि. सांगली) येथील रिअल इस्टेट, शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करणार्या तरुण व्यवसायिकाला 10 जणांच्या टोळीनं कट रचून किडनॅप करत 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात आठ दिवसांनी कुख्यात गुंड गजा मारणे याला सातारा जवळ वाई येथे पुणे पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात साताऱ्यातील चौघांचा समावेश असून, गजा मारणेला अटक झाल्यानं […]
ADVERTISEMENT

–इम्तियाज मुजावर, सातारा
पुणे व तासगाव (जि. सांगली) येथील रिअल इस्टेट, शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय करणार्या तरुण व्यवसायिकाला 10 जणांच्या टोळीनं कट रचून किडनॅप करत 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात आठ दिवसांनी कुख्यात गुंड गजा मारणे याला सातारा जवळ वाई येथे पुणे पोलिसांनी अटक केली.
या प्रकरणात साताऱ्यातील चौघांचा समावेश असून, गजा मारणेला अटक झाल्यानं साताऱ्यात त्याच्यावर अशी दुसऱ्यांदा कारवाई झाल्यानं त्याचे जिल्ह्यातील कनेक्शन पुन्हा समोर आलं आहे. हेमंत पाटील, फिरोज तात्या, अमर किर्दत, पप्पू घोलप, गजा मारणे, रुपेश मारणे, अनोळखी महिला व अनोळखी तिघे ते चौघे (सर्व संशयित रा. पुणे, सातारा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गुंड गजा मारणेला अटक करण्यात आलेलं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार मूळ घटना 7 आक्टोबर 2022 रोजी घडलेली आहे. तक्रारदाराचा रिअल इस्टेट व शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. 2021 मध्ये त्यांच्या ओळखीच्या माध्यमातून यातील सांगलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य संशयित हेमंत अण्णा पाटील हे संपर्कात आले.