Gautami Patil : अन् गौतमी पाटीलचा कार्यक्रम… नेमके काय घडलं?
Gautam Patil Pune Junnar Dance Show : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात आदिवासी महिलांच्या हातात सुरक्षेसाठी काठ्या.अनोख्या बंदोबस्तामुळे कार्यक्रम शांततेत पार पडला.
ADVERTISEMENT
Gautami Patil Pune Junnar Dance Show : पिराचीवाडी,जुन्नर, पुणे : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलची (Gautam Patil) क्रेझ तरूणांमध्ये भलतीच वाढत चालली आहे. या क्रेझअभावी अनेकदा तिच्या कार्यक्रमात गोंधळ आणि धुडगुस उडाल्याच्या बातम्या समोर येत असतात. मात्र प्रथमच पुण्यात (Pune) गौतमीचा एक कार्यक्रम शांततेत पार पडला. कोणताही गोंधळ, धुडगुस न झाल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान गौतमीच्या या कार्यक्रमात नेमकं काय झालं ज्यामुळे प्रथमचं गोंधळ टळलाय, हे जाणून घेऊयात.( gautami patil program tribal women get sticks for safety in the hands junnar pune)
ADVERTISEMENT
गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) प्रत्येक कार्यक्रमात गोंधळ आणि धुडगूस उडालाय.मात्र जुन्नर तालुक्यातील निमदरी गावाजवळच्या पिराचीवाडी येथील वेताळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त पार पडेलेला तिचा कार्यक्रम पहिल्यांदाच शांततेत पार पडलाय. त्यामुळे लावणी शौकिनांनी आश्चर्य व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : Instagram वर मैत्री, 5 वर्ष शारीरिक संबंध अन् अचानक पाठवले मोबाइलवर ‘ते’ Video…
त्याचं झालं असे की, गौतमीच्या (Gautami Patil) कार्यक्रमात गोंधळ होऊ नये म्हणून येथील आदिवासी ठाकर समाजातल्या महिला भगिनींसह काही महिलांनी सुरक्षिततेची जबाबदारी हातात घेतली होती. या महिलांनी कार्यक्रमात धुडगुस आणि गोंधळ टाळण्यासाठी हातात काठ्या व दांडकी घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता. याशिवाय गौतमी पाटीलचे वैयक्तिक काही सुरक्षारक्षक व खाजगी कंपनीचे सुमारे २५ बाऊन्सर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. याशिवाय जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस देखील बंदोबस्तासाठी तैनात होते.इतकंच नाही तर स्टेजच्या समोरच तरुणांची मोठी गर्दी होते म्हणून तेथे महिलांना बसविण्यात आले होते. त्यामुळे तिचा हा पहिलाचा कार्यक्रम कोणताही अनुचित प्रकार न घडता किंवा गोंधळ गडबड न होता शांततेत पार पडला.
हे वाचलं का?
दरम्यान यापूर्वी ओतुर जवळील फापाळे शिवार येथे एका लग्नाच्या वरातीच्या कार्यक्रमात गौतमीचा (Gautami Patil) कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यावेळी प्रेक्षकांनी कार्यक्रमाच्या शेजारी असलेल्या शेतामध्ये पिकांचे नुकसान केले होते. त्यामुळे त्यांना शेतमालकाच्या दगडांचा मार सहन करावा लागला होता. एवढेच नव्हे तर तेथे झाडावर बसलेल्या रसिक प्रेक्षकांना खाली उतरण्यासाठी गौतमीला विनवणी करावी लागली होती, इतकी वाईट परिस्थिती होती.
हे ही वाचा : मुलगी 5 वर्षाची झाली तरी संशय, दोघांनी टेस्ट करताच धक्काच बसला
पिराचीवाडी येथील वेताळेश्वर यात्रेत गौतमीचा (Gautami Patil) कार्यक्रम शांततेत पार पडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच महिलांनी सुरक्षेसाठी दंडूके हातात घेतल्याच्या भूमिकेचे कौतूक होतेय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT