मुलगी 5 वर्षाची झाली तरी संशय, दोघांनी टेस्ट करताच धक्काच बसला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Husband took paternity test
Husband took paternity test
social share
google news

Husband took paternity test : कोणतंही नातं असो त्यात विश्वास फार महत्वाचा असतो.जर नात्यात विश्वासच नसेल तर नातं फार काळ टिकत नाही. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एक जोडपं आहे. (married Couple) त्यांचे लग्न झाले असून त्यांना एक सुंदरशी मुलगी आहे. या तीन जणांच्या कुटूंबात सर्व काही सुरळीत सुरु होते. मात्र अचानक पतीने पॅटरनिटी टेस्ट (paternity test) केली आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. (husband took paternity test he is confused about father of their daughter)

पतीची पॅटर्निटी टेस्ट

या घटनेत पत्नी आणि पतीला एक मुलगी आहे. दोघांचा एक सुखी संसार आहे. मात्र या सुखी संसारात आता संशयाच मीठ पडलंय. त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. घटनेतील महिलेने तिच्या पतीचा अजिबात विश्वास नव्हता. तो अनेकदा पत्नीवर परपुरूषासोबत नात्यात असल्याचा संशय व्यक्त करायचाय. याच संशयातून त्याने पॅटरनिटी टेस्ट (paternity test) करण्याचा निर्णय घेतला. या टेस्टमधून एखाद अपत्य आपलं आहे की नाही याची माहिती मिळते. पतीने ही पॅटरनिटी टेस्ट केल्यानंतर त्याचा अहवाल निगेटीव्ह आला आणि त्याचा महिलेवरचा संशय खरा ठरला. त्यामुळे आता पतीने घटस्फोट (Divorce) घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा : Instagram वर मैत्री, 5 वर्ष शारीरिक संबंध अन् अचानक पाठवले मोबाइलवर ‘ते’ Video…

आम्ही दोघे भेटण्याआधी मी दुसऱ्या एका व्यक्तीसोबत नात्यात होते. पण माझ्या मुलीचा पिता हा माझा पतीच आहे.अनेक प्रय़त्न केल्यानंतर आम्हाला बाळ झालं होतं, असे महिला सांगतेय. मी कधीही त्याला फसवले नाही आणि कधीही फसवणार नाही. मात्र टेस्टचा निकाल निगेटीव्ह आल्यानंतर त्याला वाटले तो मुलीचा वडिल नाही आहे. त्यामुळे तो अनेक महिन्यापासून माझ्यासोबत वाईट वागतोय,असे महिलेने सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महिलेने टेस्ट करताच धक्का बसला…

आता मी स्वत:ला निर्दोष ठरवण्यासाठी टेस्ट करण्याचा निर्णय़ घेतला आहे. आम्ही तिघांनी टेस्ट केल्या. या टेस्टमध्ये खुपच धक्कादायक अहवाल आला. ज्या मुलीला आम्ही आमचे समजत होतो ती ना माझी मुलगी होती, ना माझ्या पतीची, असे महिला सांगते. मला नाही माहिती हे कसे झाले. पण आता आम्ही हॉस्पीटल विरूद्ध तक्रार दाखल केली आहे.

हे ही वाचा : उंदराच्या हत्येनंतर आता सापाच्या खुनाचा खटला, Video झाला व्हायरल

या घटनेनंतर माझा नवरा तरं घरी आलाय,पण संपूर्ण आयुष्य बदलले. आम्ही ती चाचणी केली पाहिजे नव्हती, अशी खंत देखील महिलेला आहे. तसेच आता मी माझ्या मुलीसोबतच झोपतेय. कारण मला भीती आहे की कोणी माझ्यापासून माझ्या मुलीला हिरावून नेईलं. तसेच मला हे जाणून घ्या माझं खरं बाळ कुठे आहे, आणि देवाची प्रार्थना करते की तो जिकडे कुठेही असेल तिकडे सुखरूप असेल.

ADVERTISEMENT

महिलेने तिच्या आयुष्यातील ही संपूर्ण स्टोरी सोशल मीडियावर शेअऱ केली आहे. या स्टोरीवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT