अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीने ‘असा’ काढला काटा
झालावाड (राजस्थान): राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात एका सरकारी शिक्षकाची पत्नीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे वर्षभरापासून दुसऱ्या एका व्यक्तीशी अनैतिक संबंध सुरु होते. त्यामुळे आपल्या याच प्रियकरासोबत मिळून महिलेने आपल्या पतीची हत्या (Murder) केली. यानंतर मृतदेह कारमध्ये भरून तिने शहराबाहेर फेकून दिला. यावेळी वापरण्यात आलेली कारही तिथेच सोडून दिली होती. पोलिसांनी तात्काळा या […]
ADVERTISEMENT

झालावाड (राजस्थान): राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात एका सरकारी शिक्षकाची पत्नीनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे वर्षभरापासून दुसऱ्या एका व्यक्तीशी अनैतिक संबंध सुरु होते. त्यामुळे आपल्या याच प्रियकरासोबत मिळून महिलेने आपल्या पतीची हत्या (Murder) केली. यानंतर मृतदेह कारमध्ये भरून तिने शहराबाहेर फेकून दिला. यावेळी वापरण्यात आलेली कारही तिथेच सोडून दिली होती. पोलिसांनी तात्काळा या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतरच संपूर्ण घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश कुमार हा अकलेरा माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक होता. 28 जानेवारी 2022 रोजी बरडावदा मुकेशचा मृतदेह सापडला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाच तपास सुरु केला. यावेळी मुकेशच्या मानेवर जखमेच्या खुणा होत्या आणि मुकेशची कारही जवळच सापडली होती.
गाडी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मुकेशच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली. या तपासादरम्यान कविता मीना यांनी यापूर्वीही मुकेशला मारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. ज्या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला होता.
एसपी मोनिका सेन यांनी सांगितले की, 28 जानेवारी 2022 रोजी पोलिसांना बरडावदा जवळ एक मृतदेह पडल्याची माहिती मिळाली होती. मृत व्यक्ती मुकेश कुमार असून तो एका माध्यमिक शाळेत शिक्षक असल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं. ज्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली ज्यामध्ये पत्नी कविता हिनेच मुकेशची हत्या केल्याचं समोर आलं.