भयंकर… हिमकडा कोसळल्याने नदीला महापूर, ५० जण वाहून गेल्याची भीती
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची एक टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. हा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला असून पाण्याचे लोट प्रचंड वेगाने वाहत असून यामध्ये तब्बल 50 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही दुर्घटना आज (७ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजेच्या सुमारास […]
ADVERTISEMENT
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची एक टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. हा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला असून पाण्याचे लोट प्रचंड वेगाने वाहत असून यामध्ये तब्बल 50 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही दुर्घटना आज (७ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेनंतर आयटीबीपीचे २०० हून अधिक जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आता बचाव कार्य सुरु केलं आहे. याशिवाय SDRG च्या १० टीम देखील आता येथे पोहचल्या आहेत. ही संपूर्ण दुर्घटना लक्षात घेऊन प्रशासनाने हरिद्वार, ऋषिकेश आणि श्रीनगरमध्ये अलर्ट जारी केला आहे.
ADVERTISEMENT
चमोली जिल्ह्यातील रैणी गावाच्या वरच्या बाजूस हिमकडा तुटल्याने येथून जवळच सुरु असलेल्या पॉवर प्रोजेक्ट ऋषि गंगाचं मोठं नुकसान झालं आहे. तसंच धौली गंगा नदीला आलेल्या पुरामुळे जवळील धरणाचा काही भाग देखील तुटला असल्याचं समजतं आहे. निसर्गाचा हा प्रकोप अत्यंत भयंकर असून आतापर्यंत यामध्ये किती नुकसान झालं आहे याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.
या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट झालं असून आता एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहचणं सुरु झालं आहे. कोसळलेल्या हिमकड्यामुळे उद्भवलेली पूरपरिस्थिती अत्यंत भयंकर असून हा हिमकडा चमोलीहून थेट ऋषिकेशपर्यंत पोहचला आहे.
हे वाचलं का?
लोकांनी सुरक्षित स्थळी जावं, पोलिसांचं आवाहन
या दुर्घटनेची भीषणता लक्षात घेऊन येथील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धौली गंगा नदीच्या किनारी असलेल्या गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाने तात्काळ अलर्ट देखील जारी केला आहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, ‘लोकांना सूचित केलं जात आहे की, तपोवन रेणी भागात हिमकडा कोसळल्याने ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्टला खूपच नुकसान झालं आहे. यामुळे नदीच्या पाण्याचा स्तर सातत्याने वाढत आहे. ज्यामुळे अलकनंदा नदी किनारी राहणाऱ्या लोकांना अपील करण्यात येत आहे की, त्यांनी लवकरात लवकर सुरक्षित स्थळी जावं.’
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री रावतांनी दिले बचाव कार्याचे आदेश
ADVERTISEMENT
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना असं म्हटलं आहे की, ‘चमोल जिल्ह्यातील दुर्घटनेची माहिती मिळाली असून जिल्हा प्रशासन, पोलीस आणि आपत्ती निवारण विभागाला बचाव कार्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. तसेच लोकांनी इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. सरकार सर्व आवश्यक ते उपाय करीत आहे.’
यावेळी रावत यांनी केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, ‘जर आपण प्रभावित क्षेत्रात अडकला असल्यास आणि आपल्याला कोणत्या मदतीची गरज असल्यास तात्काळ आपत्ती निवारण केंद्राच्या 1070 किंवा 9557444486 या क्रमांकावर संपर्क साधा. कृपया या घटनेबाबत जुने व्हिडिओ शेअर करुन अफवा पसरवू नका. मी स्वत: घटनास्थळी जात आहे.’
गृह मंत्रालयाचंही संपूर्ण दुर्घटनेकडे लक्ष
या दुर्घटनेकडे गृह मंत्रालय देखील लक्ष ठेऊन आहे. तसेच आयटीबीपी सातत्याने गृह मंत्रालयाच्या संपर्कात आहे. आयटीबीपीच्या रिजनल रिस्पॉन्स सेंटरमधून एक मोठी टीम रवाना झाली आहे. आयबटीबीपीच्या टीमसोबत तात्काळ ब्रिज बनविण्यात तज्ज्ञ असणाऱ्या जवानांना देखील रवाना करण्यात आलं आहे. याशिवाय २०० जवानांची आणखी एक टीम जोशीमठसाठी रवाना झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT