Mumbai Building collapse: मुंबईत इमारत दुर्घटना, तिघांचा मृत्यू, सातजण जखमी
मुंबईतल्या गोवंडी भागात इमारतीचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत सात जण जखमी झाले आहेत. या सगळ्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी पहाटे 4.58 ला ही घटना घडली आहे. सात जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. या सगळ्यांवर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. चिपळूण, खेड आणि […]
ADVERTISEMENT
मुंबईतल्या गोवंडी भागात इमारतीचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत सात जण जखमी झाले आहेत. या सगळ्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शुक्रवारी पहाटे 4.58 ला ही घटना घडली आहे. सात जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. या सगळ्यांवर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
ADVERTISEMENT
राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. चिपळूण, खेड आणि महाडमध्ये पूरस्थिती आहे. सांगली आणि कोल्हापूरलाही पुराचा धोका आहे. रायगडमध्ये दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अशा सगळ्या स्थितीत मुंबईत इमारतीचा भाग कोसळण्याचीही घटना घडली आहे. मुंबईतल्या गोवंडी या ठिकाणी असलेल्या 1+1 इमारतीचा भाग कोसळला या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर सात जणांना राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे वाचलं का?
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी सहा तास बचाव कार्य सुरू होतं. आता ढिगारा आणि इमारतीचा कोसळलेला भाग उपसण्याचं काम सध्या सुरू आहे.
मागील आठवड्यात चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले.चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता तर विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. तर भांडूपमध्येही भिंत कोसळून 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ आता ही आणखी एक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
महाडमध्ये माळीणची पुनरावृत्ती
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे एक मोठी दुर्घटना घडली आहे. महाडमधील तळई गावातील तब्बल 30 हून अधिक घरांवर दरड कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या दुर्घटनेत येथील तब्बल 70 ते 75 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती मिळते. दरम्यान, काही वर्षांपूर्वीच अशीच घटना पुणे जिल्ह्यातील माळीण गावात घडली होती. ज्यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT