राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी!
मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तीन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात महाराष्ट्राविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर आता भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले आहे. राज्यपालांच्या त्या वक्तव्यानंतर राज्यात प्रचंड मोठी गदारोळ पाहायला मिळाला होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या निवेदनात काय म्हटले? 29 जुलै रोजी एका सार्वजनिक […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तीन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात महाराष्ट्राविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर आता भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्या वतीने एक निवेदन जारी करण्यात आले आहे. राज्यपालांच्या त्या वक्तव्यानंतर राज्यात प्रचंड मोठी गदारोळ पाहायला मिळाला होता.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या निवेदनात काय म्हटले?
29 जुलै रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात काही समाजाच्या योगदानाचे कौतुक करण्यात माझ्याकडून काही चूक झाली. केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारताच्या विकासात प्रत्येकाचे विशेष योगदान आहे. विशेषत: संबंधित राज्याची उदारता आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या उज्ज्वल परंपरेमुळे आज देश प्रगतीकडे वाटचाल करत आहे, असं भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
गेल्या तीन वर्षांत मला महाराष्ट्रातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा आदर वाढवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. पण वरील भाषणात माझ्याकडून चुकून काही चूक झाली असेल तर ही चूक महाराष्ट्रासारख्या महान राज्याचा अवमान मानण्याची कल्पनाही करता येणार नाही. महाराष्ट्राच्या थोर संतांच्या परंपरेतील या विनम्र राज्य सेवकाला क्षमा करून आपण मोठे हृदय दाखवाल, असंही भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
मा. राज्यपालांचे निवेदन pic.twitter.com/3pKWHYgPp8
— Governor of Maharashtra (@maha_governor) August 1, 2022
नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी केलं होतं समर्थन
राज्यपालांचे समर्थन करत नितेश राणेंनी ट्विट केले होते. ”राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे.. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात. एवढेच कशाला .. तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी कडे देऊन ठेवली आहे ते चालत का ? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही ?” अशा आशयाचे ट्विट नितेश राणे यांनी केले होते. पत्रकार परिषद घेत नितेश राणे म्हणाले ”कालच्या कार्यक्रमाला मी स्वतः होतो आणि इतर लोक प्रतिनिधी उपस्थित होते. राजस्थान, गुजराती समाज त्या ठिकानी होता, त्या ठिकाणी जे भाषण केले त्यात अपमान झाला असता तर आम्ही गप्प बसलो असतो का?” असे नितेश राणे म्हणाले.